Friday, September 1, 2023

नवी उमेद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नवी उमेद

कालचा भूतकाळ विसरून,
आज कुणीही एकत्र येऊ शकते.
नव्या भविष्याचे आश्वासन,
फक्त राजकारणच देऊ शकते.

राजकीय आघाड्यांची बांधणी,
याच तत्त्वावर झालेली असते !
जरी दरवेळी नवीन निराशा,
सर्वांच्या पदरी आलेली असते !;

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8343
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1सप्टेंबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025