Monday, September 25, 2023

उलट्या बोंबा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
उलट्या बोंबा
आपल्या भारतीय लोकशाहीचा,
बघा काळ कशी परीक्षा घेतो आहे ?
लोकशाहीच्या रक्षण कर्त्यांकडूनच,
लोकशाहीचा गळा दाबला जातो आहे.
लोकशाही वाचवा;लोकशाही वाचवा,
अशा उलट्या बोंबा मारल्या जातात.
चक्क लोकशाहीच्या मार्गानेच,
लोकशाहीला खडे चारल्या जातात.
लोकशाही स्वार्थाला आडवी येताच,
तिच्याच विरोधात सारे असतात !
लोकशाही नाकारणाऱ्यांकडूनच,
लोकशाही जिंदाबादचे नारे असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
25सप्टेंबर2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...