Saturday, September 23, 2023

बदलते राजकारण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बदलते राजकारण

कालचे प्यादे आणि वजीर,
आजचे चक्क राजे झाले.
बदलत्या राजकारणात,
कालचे उंचच खुजे झाले.

बदलत्या राजकारणाची,
हीच बदलती दिशा आहे.
म्हणूनच तर राजकारण,
वाढत जाणारी नशा आहे.

वजीर आणि राजांची,
सगळीकडून नाकाबंदी आहे !
बदलते राजकारण म्हणजे,
प्याद्यांसाठी संधी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8363
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...