आजची वात्रटिका
-------------------------
डाटा एन्ट्री ऑपरेटर
शिक्षकांच्या वास्तवाबाबत,
तसे सांगण्यासारखे खूप आहे.
पण डाटा एन्ट्री ऑपरेटर,
हे शिक्षकाचे मॉडर्न रूप आहे.
मोबाईल म्हणजे जणू,
शिक्षकांसाठी शाप आहे.
तोच डाटा,तोच आटापिटा,
दरवेळीच नव नवे ॲप आहे.
मोबाईल युगाचे सुख दुःख,
शिक्षकांच्या वाट्याला आहे !
काय शिकवले बघतो कोण?
महत्व फक्त डाट्याला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8347
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5सप्टेंबर2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- खोके आणि धोके खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे. खोक्या आणि धोक्याच...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment