आजची वात्रटिका
-------------------------
निरक्षरतेची शोधाशोध
किती अभियानं आले गेले,
भारत साक्षर झाला नाही.
अगदी शंभर टक्के रिझल्ट,
कधीच हाती आला नाही.
प्राथमिक शिक्षकांच्या गळ्यात,
सगळी अभियान पडू शकतात.
आजचे निरक्षर शोधता शोधता,
भावी निरक्षरही वाढू शकतात.
खाजगीकरणाची खाज,
जर सर्वच क्षेत्रात वाढते आहे.
मग अभियानांच्याच बाबतीत,
हे धोरण सांगा कुठे नडते आहे?
कोणतेही अभियान आले की,
तिथे फक्त शिक्षकांचे मरण आहे!
निरक्षरांचे प्रमाण वाढण्याचे,
खरे हेच तर मोठे कारण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6917
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -10सप्टेंबर2023
No comments:
Post a Comment