Friday, September 15, 2023

पुरस्कारांचा व्यवहार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पुरस्कारांचा व्यवहार

सरकारी काय?खाजगी काय?
पुरस्कार विकत भेटले जातात.
ज्याची खरेदीची ताकद आहे,
फक्त त्यालाच ते वाटले जातात.

कुणामुळे वाढते पुरस्काराची उंची,
कुणा -कुणामुळे उंची घटली जाते.
पुरस्कार देण्या घेण्याची मजा,
अगदी जगजाहीरपणे लुटली जाते.

एखादा पुरस्कार लाटला की,
पुरस्काराला पुरस्कार फुटू लागतात !
थोडेफार प्रामाणिक पुरस्कारही,
त्यांच्यामुळेच खोटे वाटू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8356
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15सप्टेंबर2023
 

No comments:

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- फूट आणि विलीनीकरण फुटीनंतर विलीनीकरण असते, विलीनीकरणानंतर फूट असते. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,...