Thursday, September 28, 2023

कागदी घोडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कागदी घोडे

योजना कोणतीही असो,
तिला कागदी घोडे जातात.
प्रत्यक्ष अंमलबजावणीवाले,
तसे फारच थोडे असतात.

कागदोपत्री योजना,
फक्त फायलींना भार होतात !
कागदी घोडे लावले की,
योजनाही त्याच्यावर स्वार होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
28सप्टेंबर2023
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...