Monday, September 18, 2023

लोकप्रिय वक्ते...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकप्रिय वक्ते

जसे शब्द केवळ फेकता येतात,
तसे भाषणेही खूप ठोकता येतात.
पण आपले खरे आदर्श कोण?
हे मात्र कुठे त्यांना जोखता येतात?

काही भाषणं मवाळ असतात,
काही भाषणं तापट असतात.
मिठू मिठू बोलणारे तर,
निव्वळ पोपट एके पोपट असतात.

पोपटांबरोबरच पोपटपंचीलाही,
मार्केटमध्ये भाव आणि वाव आहे !
मार्केट जास्त असणारांचेच,
आज 'लोकप्रिय वक्ते' हे नाव आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6921
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...