Saturday, September 2, 2023

राजकीय कोडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय कोडे

ऐकावे आणि बघावे,
ते सगळेच कोडे आहे.
हेही कळत नाही,
कोण कुणाच्या मागे?
कोण कुणाच्या पुढे आहे?

पुढेही खूप झाले,
मागे सुद्धा खूप झाले.
काल मोठ्याने ओरडणारे,
आज अचानक चूप झाले.

पुढच्यांनाही चोरी आहे,
मागच्यांनाही चोरी आहे. !
कानामागून आलेल्यांची,
सर्वत्रच शिरजोरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8343
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...