Sunday, September 3, 2023

सूर्यवाणी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सूर्यवाणी

चांद्रयानाने केले चंद्रावर लँडिंग,
आदित्यची सूर्याकडे झेप आहे.
तरीही मंगळ वक्री असल्याची,
कुडमुड्यांची रेकॉर्डडेड टेप आहे.

काही कुडमुडे अडाणी आहेत,
काही शिकले सवरलेले आहेत.
आता आपले धंदे बसणार,
म्हणून काही बावरलेले आहेत.

कुणी राहू केतू बोकांडी घेऊन,
शनिच्या फेऱ्यात अडकतो आहे.
उघड सत्याकडे डोळे झाक करून,
सनातनी तोऱ्यात भडकतो आहे.

आकाश कवेत घेताना,
हे सारे पातळयंत्र सोडले पाहिजे !
विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी,
सर्वांनीच नाते जोडले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6911
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3सप्टेंबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025