Sunday, September 17, 2023

पॅकेज रिचार्जिंग ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पॅकेज रिचार्जिंग

जुन्याच घोषणा;जुनीच आश्वासने,
लोकांनाही गृहीत धरले जाते.
पॅकेज जुने असले तरी,
त्यालाच नवे रिचार्ज मारले जाते.

सत्ताधारी कुणीही असले तरी
हाच राजमार्ग शोधला जातो!
जुनेच पॅकेज;नवी रिचार्जिंग,
राजकीय बॅलन्स साधला जातो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3
17सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...