Friday, September 1, 2023

डाळ म्हणाली गॅसला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

डाळ म्हणाली गॅसला

महागाईची आग काही,
तू कधीच विझू देत नाही.
आमची कुणाचीच डाळ,
तू कधीच शिजू देत नाही.

तू खाली उतरलास की,
आम्हाला वर चढवले जाते.
फसव्या फसव्या शब्दांनी,
स्वस्ताईला मढवले जाते.

स्वस्ताईच्या आनंदात,
महागाईही सोसली जाते!
तिच्या अपचनाची झलक,
तुझ्या रुपात दिसली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6909
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
1 सप्टेंबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025