Friday, September 22, 2023

नारीशक्ती वंदन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नारीशक्ती वंदन

महिला आरक्षणाच्या निमित्ताने,
संसदेचे नारीशक्तीला वंदन आहे.
आरक्षण विधेयक मंजूर तरी,
त्याला 2029 पर्यंत चंदन आहे.

संसदेमध्ये महिलांसाठी,
आरक्षणाचे प्रमाण 33टक्के आहे.
त्याला आगामी जनगणनेची बाधा,
एवढे मात्र अगदी पक्के आहे.

महिला आरक्षणाच्या विधेयकाची,
ही सत्तावीस वर्षांची लढाई आहे!
या विधेयकाच्या श्रेयासाठी तर,
नेहमीप्रमाणे सगळ्यांची बढाई आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8362
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...