Tuesday, September 5, 2023

मुद्द्याची गोष्ट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मुद्द्याची गोष्ट

यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात,
राजकारणाचा चेंडू दटवला जातो.
आपला मुद्दा कसाही असला तरी,
तो लोकांना बरोबर पटवला जातो.

सत्ताधारी असोत वा विरोधक,
त्यांना कसलाच फरक पडत नाही.
मुद्द्याच्या बाजूने वा विरोधात,
त्यांचे बोलणेही कधीच अडत नाही.

जसे मुद्द्यांनीच मुद्दे अडवले जातात,
तसे मुद्द्यांनीच मुद्दे सडवले जातात !
मुद्दा आपोआप सुटला की,
मग श्रेयाचे ढोलही बडवले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6913
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -5सप्टेंबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025