Wednesday, September 27, 2023

दबाव तंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
दबाव तंत्र
शिकाऱ्याला शिक्षा आहे,
भिकाऱ्याला भिक्षा आहे.
सवयीच्या गुलामांना तर,
गुलामीचीच दीक्षा आहे.
मुजाऱ्यांचे हुजरे आहेत,
बाजारबसविला गजरे आहेत.
निलाजऱ्यांची संख्या मोठी,
थोडेफार लाजरे बुजरे आहेत.
जिथे स्वाभिमानाचा अभाव,
त्यांच्यावरतीच दबाव आहे !
साम-दाम-दंड-भेदाचा,
जिकडे तिकडे प्रभाव आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
27सप्टेंबर2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...