Tuesday, September 19, 2023

जुन्या संसद भवनाच्या आठवणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
जुन्या संसद भवनाच्या
आठवणी
रथी पाहिले मी;महारथी पाहिले मी,
कसे सांगू किती किती पाहिले होते?
जसे सोन्याचे दिवस अनुभवले मी,
कसे सांगू मी किती साहिले होते ?
गुलामी पहिली; निलामी पाहिली,
मी स्वातंत्र्याच्या कळा सोसल्या होत्या.
कधी अभिमाननाने फुलली होती छाती,
कधी मला इंगळ्याही डसल्या होत्या.
जसे पोलादी इरादे पाहिले होते मी,
तसे मी प्रगतीचे पल्ले पाहिले होते.
अतिरेक्यांबरोबर माकडांचेही,
मी हल्ल्यांवरती हल्ले पाहिले होते.
जसे माझ्या हृदयी कमळ फुलले होते,
तसा माझ्या मनात मोर नाचला होता !
माझी सिंहमुद्रा बघून बघून,
जगापर्यंत योग्य संदेश पोचला होता !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6922
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19सप्टेंबर2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...