Monday, September 4, 2023

ढगात गोळ्या...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ढगात गोळ्या

ढगात गोळ्या माराव्यात तसे,
पावसाचे अंदाज मारले जातात.
जेंव्हा एखादा अंदाज बरोबर येतो,
तेंव्हा अनेक चुकीचे ठरले जातात.

टिचभर अभ्यास;हातभर अंदाज,
अशी पावसाच्याअंदाजांची तऱ्हा.
चुकून पाऊस पडला तर,
जो तो म्हणतो माझाच खरा आहे.

चुकीचे अंदाज सांगणाऱ्या विरुद्ध,
पावसाने बंड करायला पाहिजे !
आपली बदनामी करणाऱ्यांना,
पावसाने दंड करायला पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8346
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...