Thursday, September 7, 2023

संधी साधू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संधी साधू

जसे तवा तापलेला दिसला की,
कुणीही आपल्या पोळ्या भाजून घेतो.
तसे आयते अंथरूण दिसले की,
कुणीही अंथरुणावर निजून घेतो.

आयत्या अंथरुणाचा अंदाज न घेता,
वाट्टेल तसे पाय पसरले जातात.
बुडत्याचा पाय नेहमीच खोलात,
तरीही नको तिथे घसरले जातात.

अशावेळी फुकटचे फौजदारही,
चोर सोडून संन्यासाला फाशी देतात!
लोण्याचा गोळ्यावर बोके टपले की
माकडं आयती संधी कशी घेतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8349
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...