Thursday, August 31, 2023

दैनिक वात्रटिका 31ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे... अंक - 87वा

दैनिक वात्रटिका
31ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 87वा
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1nYfI20hYGFciia99kKpeuWNvLzbu2o-F/view?usp=drivesdk
 

ऑफर एके ऑफर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ऑफर एके ऑफर

जिकडे बघावे तिकडे,
राजकीय अफरातफर आहे.
इथल्या प्रत्येकाला,
कसली तरी ऑफर आहे.

इकडे येता की तिकडे जाता?
ऑफरवाल्यांची धमकी आहे.
तुरुंगाची वाट दाखवणारी
ऑफरसुद्धा खमकी आहे.

कुणाला वाटतात खऱ्या,
कुणाला वाटते खोट्या आहेत !
म्हणूनच प्रत्येक ऑफरवरती,
आज राजकीय कोट्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8342
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
31ऑगस्ट 2023
 

आघाडीच्या शंका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आघाडीच्या शंका

आघाडी करणे सोपे असते,
ती टिकवणे अवघड होत जाते.
रुसवे फुगवे काढता काढता,
सगळ्यांनाच मग जड होत जाते.

तेवढी आघाडी जटिल होते,
जेवढे त्यात घटक पक्ष असतात.
कुणी अहंकार दुखावतोय का?
याबाबत सगळेच दक्ष असतात.

आघाडी कुणाचीही असली तरी,
तिला अविश्वासाचा शाप असतो !
आघाडी कुणाचीही असली तरी,
आघाडील आघाडीचा ताप असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6908
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
31ऑगस्ट2023
 

Wednesday, August 30, 2023

दैनिक वात्रटिका30ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 86वाअंक डाऊनलोड लिंक -


दैनिक वात्रटिका
30ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 86वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

गरज सरो....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गरज सरो....

राजकारणात कायमचे,
कुणी शत्रू ना मित्र असतात.
राजकीय गरजेपोटी,
जुळवले गेलेले सूत्र असतात.

उपकारा बिपकाराला तर,
राजकारणात काही स्थान नसते.
तेवढ्यापुरती घेतली जाते,
ती फक्त सत्तेचीच आन असते.

जेंव्हा गरजा सरल्या जातात,
नव्या वाटा धरल्या जातात !
कालच्या भूतकाळाने,
नव्या वाटा घेतल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8341
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30ऑगस्ट 2023
 

अलाराम आणि बझर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अलाराम आणि बझर

राष्ट्रवादीच्या एका गटाची,
भाजपाशी सलगी आहे.
संघर्षाच्या आगीमध्ये,
आता तर तेल-घी आहे.

सांगा कुणामुळे कुणाचे,
आज आर्म स्ट्रॉंग आहेत ?
तुमचे उत्तर करेक्ट सांगतेय,
नेमके कोण रॉंग आहेत?

घोटाळ्यांचे पुरावे म्हणून,
स्टॅम्प पेपर हजर आहेत !
अलाराम बरोबर घड्याळाचे,
आता बझरवर बझर आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6907
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
30ऑगस्ट2023
 

Tuesday, August 29, 2023

नाटकीय वळण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नाटकीय वळण

आज इथल्या प्रत्येकाचा,
फक्त सत्तेशी करार आहे.
त्यामुळेच राजकारणात,
रोज नवा नवा थरार आहे.

आपलीच सावली इथे,
आज आपलीच स्पर्धक आहे.
रोजच्या राजकीय नाट्याचा,
अंकसुद्धा उत्कंठावर्धक आहे.

पहिल्या राजकीय नाट्यावरती,
दुसऱ्यामुळे पडदा पडतो आहे !
हिरो कोण? व्हीलान कोण?
प्रश्नावर प्रत्येकजण अडतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8340
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29ऑगस्ट 2023
 

दैनिक वात्रटिका29ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 85 वा



दैनिक वात्रटिका
29ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 85 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

चंद्रावर झेंडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चंद्रावर झेंडा

सगळ्या जगाकडून कौतुक ,
भारताने चार चांद लावले आहेत.
पाकिस्त्यांनी मात्र सवयीप्रमाणे,
'चांद्रयान3' ला नावं ठेवले आहेत.

त्यानेच टीका-कौतुक करावे,
ज्याची काही एक लायकी आहे.
विरोधाला विरोध करणे,
ही वृत्तीच तशी बायकी आहे.

पाकिस्तान्यांचे शेपूट वाकडेच,
त्यावरती वाकडाच गोंडा आहे!
त्यांच्या फक्त झेंड्यावर चंद्र,
आपला तर चंद्रावर झेंडा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6906
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
29ऑगस्ट2023
 

Monday, August 28, 2023

दैनिक वात्रटिका28ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 84वा


दैनिक वात्रटिका
28ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 84वा
अंक डाऊनलोड लिंक -

चांद्रयान -3 चा संदेश...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चांद्रयान -3 चा संदेश

चांद्रयान-3 चा संदेश मलाआला,
चंद्र तर खरोखरच अगम्य आहे.
पण आपल्यात आणि चंद्रात,
खड्ड्यांचे मात्र खूप साम्य आहे.

हे सगळे दुर्दैवी आहे,
याचा अभिमान वाटून घेऊ नका
पण कुणीही कुणाच्या चेहऱ्याला,
चुकूनही माझी उपमा देऊ नका.

चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात,
म्हणूनच कर्ते धर्ते गुर्मीत आहेत!
इथले सगळे खड्डे निसर्गनिर्मित,
तुमचे मात्र गुत्तेदार निर्मित आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6905
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28ऑगस्ट2023
 

Sunday, August 27, 2023

दैनिक वात्रटिका27ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 83 वा

दैनिक वात्रटिका
27ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 83 वा
अंक डाऊनलोड लिंक -

 

त्यांची सर्वत्र शाखा आहे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

त्यांची सर्वत्र शाखा आहे

काल तिकडचे घर फुटले होते,
आज इकडचेही घर फुटते आहे.
याचे तुमच्या माझ्यासकट,
अगदी सर्वांनाच वाईट वाटते आहे.

आपल्याला वाईट वाटते,
याच्यामध्येच तर सगळे आहे.
आपली भावना खरी असली तरी,
पण यातले वास्तव मात्र वेगळे आहे.

त्यांची घरं फुटली असली तरी,
त्यातही घराणेशाहीच्या मेखा आहेत !
काल एकाच पक्षात शाखा होती,
आज मात्र त्यांच्या,
सर्वच पक्षामध्ये शाखा आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6903
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
27ऑगस्ट2023
 

Saturday, August 26, 2023

दैनिक वात्रटिका26ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 82 वा

दैनिक वात्रटिका
26ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 82 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

अवमूल्यन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अवमूल्यन

मोठ्या नेत्यात होतात भांडणे,
कारण त्यांच्यात स्पर्धा आहे.
मोठ्या नेत्यांच्या भांडणामध्ये,
कार्यकर्त्यांचा मात्र खुर्दा आहे.

नेता म्हणजे बंदा रुपाया,
कार्यकर्ते म्हणजे चिल्लर आहे.
आहे ते वास्तव आहे,
जरीही उपमा थिल्लर आहे.

जसा नेत्यांचा छापा असतो,
तसा नेत्यांचाच काटा असतो!
कार्यकर्त्यांच्या अवमूल्यनात,
कार्यकर्त्यांचाच वाटा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8339
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26ऑगस्ट 2023
 

फुट-पट्टी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
फुट-पट्टी
राष्ट्रवादी फुटली की नाही?
या प्रश्नात खरी खुट्टी आहे.
पक्षीय फूट मोजण्यासाठी,
वेगवेगळी फुटपट्टी आहे.
फाटाफुटीची व्याख्या करण्यात,
कुणा - कुणाची कट्टी बट्टी आहे.
या प्रश्नातून कुणा कुणाची,
अगदी चाणाक्षपणे सुट्टी आहे.
कुणा कुणाचे पडले भुस्कट,
कुणाच्या डोक्याची कुट्टी आहे!
विक्रमापेक्षा वेताळच,
आजकाल जरा जास्त हट्टी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6902
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
26ऑगस्ट2023

Friday, August 25, 2023

चिमटा ऑक्टोबर 2019 प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांचा 77 वा वात्रटिका संग्रह

चिमटा ऑक्टोबर 2019
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे
यांचा 77 वा वात्रटिका संग्रह
डाउनलोलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1iWqxJMMiIN5NAyrPtWSG6JoHPpcWbxgN/view?usp=drivesdk

चेकमेट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चेकमेट

जसे घरही फिरलेले आहे,
तसे फिरलेले वासे आहेत.
राजकीय पटावरती,
आज उलटे सुलटे फासे आहे.

शहाला काटशह आहेत,
उलट्या सुलट्या चाली आहेत.
तेच झालेत शिकार,
वाटायचे जे सर्वांचे वाली आहेत.

ज्याच्या त्याच्या दाताखाली,
आज ज्याचे त्याचे ओठ आहेत !
आपल्याच प्याद्यांकडून,
आज राजे चेकामेट आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8338
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
25ऑगस्ट 2023
 

फॅमिली ड्रामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

फॅमिली ड्रामा

इकडून सतत म्हटले जाते,
कुणीच पक्ष सोडला नाही.
तिकडूनही सतत म्हटले जात,
आम्ही पक्ष फोडला नाही.

जनतेला उघड उघड दिसते,
ती तर तर फुटनीती आहे.
पक्ष फुटलाच नाही म्हणणे,
ही कसली कुटनीती आहे?

कुणाला वाटतात कुरघोड्या,
कुणाला वाटते तहनामा आहे !
लोकांना शंका वाटू लागली,
हा तर फॅमिली ड्रामा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6901
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
25ऑगस्ट2023
 

Thursday, August 24, 2023

चांद्र विजय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चांद्र विजय

आपणही चंद्रावर पोहोचलो,
अशी आपली ख्याती आहे.
पुन्हा नव्याने सिद्ध झाले,
चंद्र म्हणजे दगड-माती आहे.

चांद्र विजयाच्या यशानंतर,
आता सूर्याचे वेध आहे.
चंद्राच्या पारंपरिक प्रतिमेला,
चांद्रयानाचे नव्याने छेद आहेत.

आपला चांद्र विजय म्हणाजे,
रूढी परंपरांचा पराभव आहे !
आता तरी मान्य करू या,
विज्ञान हाच खरा देव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8337
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24ऑगस्ट 2023
 

दैनिक वात्रटिका 24ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 80वाअंक डाऊनलोड लिंक


दैनिक वात्रटिका
24ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 80वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

चंद्र आहे साक्षीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चंद्र आहे साक्षीला...

प्रत्येकच भारतीय, माणूस,
आज शब्दशः हवेत आहे.
प्रत्यक्ष चंद्रसुद्धा,
आता आपल्या कवेत आहे.

जेवढे हे अभिमानास्पद,
तेवढे हे सगळे भारी आहे.
चंद्र सर केल्यानंतर म्हणे,
पुढे सूर्यावरही स्वारी आहे.

विज्ञानाच्या या किमयेकडे,
वैज्ञानिक दृष्टीतून बघायला हवे!
विज्ञानाचा फक्त इव्हेंट नको,
प्रत्यक्ष विज्ञान जगायला हवे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6901
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
24ऑगस्ट2023
 

Wednesday, August 23, 2023

दैनिक वात्रटिका23ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 79 वा


दैनिक वात्रटिका
23ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 79 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

कांदेपुराण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कांदेपुराण

नाकाने कांदे सोलणारांना,
कांदा झोंबायाला लागला.
ज्याला जमेल त्याला कांदा,
खिशात कोंबायाला लागला.

कुणाचा बार जबरदस्त,
कुणाचा बार फुसका आहे.
ज्याचा सगळ्यांनाच धसका,
तो कांदा तर नासका आहे.

ज्याला लाटायचे आहे,
त्याला खुशाल श्रेय लाटू द्या !
कुणीतरी आपलं आहे,
शेतकऱ्यांना कधीतरी वाटू द्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-835
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23ऑगस्ट 2023
 

मी पुन्हा येईन..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मी पुन्हा येईन..

आधी देवेंद्र..मग नरेंद्र....
सोबतीला आता एक नाथ आहे.
आजकाल राजकीय मंचावरती,
मी पुन्हा येईन...ची साथ आहे.

ज्याला यायचे आहे त्याला येऊ द्या,
प्रत्येकाच्या मनासारखे होऊ द्या.
मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...
गाणे गायचे आहे त्याला गाऊ द्या.

याचे त्याचे ऐकून ऐकून,
महागाई म्हणाली,मी का जाईन?
कुणाची इच्छा असो वा नसो,
मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6900
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
23ऑगस्ट2023
 

Tuesday, August 22, 2023

दैनिक वात्रटिका22ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 78 वा



दैनिक वात्रटिका
22ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 78 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

काका आणि धोका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

काका आणि धोका

गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
पुतण्यांचा भरवसाच उरला नाही.
असा एकही पुतण्या नाही,
जो काकांच्या डोक्यात शिरला नाही.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
पुतण्यांचा एकसारखाच हेका आहे.
आज धर्म संकटात अडकलेला,
प्रत्येकच पुतण्याचा काका आहे.

कधी कधी काकाला पुतण्या,
कधी पुतण्याला काका नडतो आहे !
सत्तेच्या महाभारतामध्ये मात्र,
नात्यागोत्यांचा मुडदा पडतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8335
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22ऑगस्ट 2023
 

एका टीकेची खंत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

एका टीकेची खंत

काखेत कळसे आहेत,
गावाला वळसे आहेत.
पाटील, कितीही उगळा;
काळेच कोळसे आहेत.

एका हाती सत्तेचेचा,
सध्याचा तरी काळ नाही,
एवढेही न कळायला,
कुणी कुक्कुले बाळ नाही.

टीका नाही,खंत वाटते;
खुलाशाचा आदर आहे !
मात्र कुणीच विसरू नये,
आपला कोण गॉडफादर आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6899
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
22ऑगस्ट2023
 

Monday, August 21, 2023

दैनिक वात्रटिका21ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 77 वा


दैनिक वात्रटिका
21ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 77 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

शिवा-शिवीची लपाछपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शिवा-शिवीची लपाछपी

जशी रंका -ररंकात शिवा-शिव आहे,
तशी रावा- रावात शिवा-शिव आहे.
फक्त एवढ्यावरच थांबत नाही तर,
इथे नावा-नावातही शिवा-शिव आहे.

जशी चोरा-चोरात शिवा-शिव आहे,
तशी सावा-सावात शिवा- शिव आहे.
यात तर कुणाचेच दुमत नाही,
इथे गावा- गावातही शिवा-शिव आहे.

जशी क्षेत्र - क्षेत्रात शिवा-शिव आहे,
तशी प्राणीमात्रात शिवा - शिव आहे !
तरीही शिवा-शिवीची लपाछपी चालते,
याचीच सगळ्यात मोठी कीव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-833
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21ऑगस्ट 2023
 

सैतान ते साधू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सैतान ते साधू

काल जो सैतान होता,
आज तोच साधू आहे.
तुम्ही असे समजू नका,
आपली बुद्धी अधू आहे.

सैतानाचा साधू होतो,
यामागे काय लॉजिक आहे?
भाजपा विरोधक म्हणतात,
ही तर ईडीची मॅजिक आहे

विरोधक तर बोलणारच,
त्यांचे तर विरोधीच कल आहेत !
आता जनताही म्हणू लागली,
हे अनुभवाचेच बोल आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6898
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21ऑगस्ट2023
 

Sunday, August 20, 2023

दैनिक वात्रटिका20ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 76 वा


दैनिक वात्रटिका
20ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 76 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

गाजर पारखी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गाजर पारखी

ताटकळलेल्या आमदारांचा,
मंत्री पदासाठी कालवा आहे.
मंत्री पदाच्या गाजराचा,
उठता बसता हलवा आहे.

तात्कळलेल्या आमदारांची,
अवस्था एक सारखी आहे.
टांगलेले गाजर सांगतेय,
कोण गाजर पारखी आहे?

मंत्री पदाच्या गाजराची,
रोज नव नवी पुंगी आहे !
खात्री तर कुणालाच नाही,
सगळा मामला सांगी-वांगी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8333
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20ऑगस्ट 2023
 

अस्मितेचे फुगे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अस्मितेचे फुगे

अहंकाराची हवा भरून भरून,
बेडकी बरोबर फुगवली जाते.
कुठली तरी अस्मिता,
अगदी अशीच जागवली जाते.

जागवलेल्या अस्मितेला,
मतदानात परावर्तित केले जाते.
आपला फुगा फुटल्याचे,
बेडकीच्याही लक्षात आले जाते.

कुठल्यातरी अस्मितेने,
बेडकी तात्पुरती तापलेली असते!
पुढच्या निवडणुका येईपर्यंत,
बेडकी गाढ झोपलेली असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6897
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
20ऑगस्ट2023
 

Saturday, August 19, 2023

दैनिक वात्रटिका19ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...


दैनिक वात्रटिका
19ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 75 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

भास आभास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भास आभास

जशा बढाया खोट्या वाटू लागल्या,
तशा लढाया खोट्या वाटू लागल्या.
जेवढ्या गोष्टी गोड वाटत होत्या,
तेवढ्या त्याच कटू वाटू लागल्या.

लढायांची आणि बाढायांची,
जनतेलाही प्रचंड चटक आहे !
काल पाहिलेला तमाशासुध्दा,
कदाचित उद्याचे एक नाटक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8332
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19ऑगस्ट 2023
 

नाराजी नाट्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नाराजी नाट्य

राजकारण ते राजकारण,
कुणीही इथे संत नाही.
नाराजी नाट्याला तर,
राजकारणात अंत नाही.

कुणाला दिवस अनिष्ट,
कुणाला दिवस इष्ट आहेत.
प्रत्येकाचेच इरादे तर,
इथे अगदीच स्पष्ट आहेत.

बाकी मुद्दे गौण झाले,
आपलाच इरादा प्रधान आहे !
त्यामुळेच नाराजी नाट्याला,
सगळीकडून उधाण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6896
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19ऑगस्ट2023
 

Friday, August 18, 2023

उत्तर सभा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
उत्तर सभा
ज्याचे घर काचेचे,
त्याच्याही हाती पत्थर आहे.
म्हणूनच पूर्वसभेला,
उत्तर सभेने उत्तर आहे.
राजकारणाचा झाला तमाशा,
म्हणूनच सवाल जबाब आहेत!
ज्याच्या त्याच्या घशात,
आज हड्डीयुक्त कबाब आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
18ऑगस्ट 2023

 

दैनिक वात्रटिका 18ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...


दैनिक वात्रटिका
18ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 74 वा
अंक डाऊनलोड लिंक -


रिल्स आपल्याला शिकवू लागले...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

रिल्स आपल्याला
शिकवू लागले....

रिल्स आपल्याला शिकवू लागले,
एखाद्याला हसवायचे कसे?
रिल्स आपल्याला शिकवू लागले,
एखाद्याला फसवायचे कसे?

रिल्स आपल्याला शिकवू लागले,
नसलेले भासवायचे कसे ?
उसनवारीच्या प्रतिभेमध्ये,
आपलेच घोडे घुसवायचे कसे?

रिल्स आपल्याला शिकवू लागले,
नेमके बाजारात बसवायचे कसे?
फिल्टर नावाचे जाळे लावून,
मायावी जग भासवायचे कसे?

रिल्स आपल्याला शिकवू लागले,
आयत्या संधीचे सोने करायचे कसे?
लढत रहा,पडत आणि घडत रहा,
प्रतिक्रियांनाही पुरून उरायचे कसे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6895
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
18ऑगस्ट2023
 

Thursday, August 17, 2023

दैनिक वात्रटिका17ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 73वा


दैनिक वात्रटिका
17ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 73वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

बॅनर वॉर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बॅनर वॉर

बॅनर विरुद्ध बॅनर,
असेच बॅनर वॉर आहे.
हे म्हणजे तोंड दाबून,
बुक्क्यांचाच मार आहे.

बॅनरवरची फोटोलॉजीची,
खोली तर गहिरी आहे.
आपलीच प्रतिमा,
आपलीच वैरी आहे.

ती म्हण इथेही लागू,
दिसते तसे कधी नसते !
वरवरच्या गोष्टींना,
जनताही सहज फसते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8331
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17ऑगस्ट 2023
 

देव देवतांचा संवाद....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

देव देवतांचा संवाद

आधी पोटोबा मग विठोबा म्हणीत,
भक्त आपल्यालाच जोपरू लागले.
स्वतःच्या फायद्यासाठी आपले भक्त,
नको तिथे आपले फोटो वापरू लागले.

स्वार्थासाठी फोटो वापरायची,
ही तर मोठी राजकीय युक्ती आहे.
लोकांना मग थापा मारत राहतात,
ही आमची देवावरची भक्ती आहे.

या विरोधात आपण कोर्टात जाऊ,
जो तो आपल्याला प्रचारून घेतो !
तेवढ्यात एक देव म्हणाला,
दादा..थोडे थांबा...
मी माझ्या काकांना विचारून येतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6894
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17ऑगस्ट2023
 

Tuesday, August 15, 2023

दैनिक वात्रटिका15ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 72 वा


दैनिक वात्रटिका
15ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 72 वा
अंक डाऊनलोड लिंक-
 

संभ्रम कल्लोळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
संभ्रम कल्लोळ
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीलाही,
जणू भाजपाची बाधा आहे.
तळागाळातल्या कार्यकर्त्यांची,
नसती द्विधा आणि त्रेधा आहे.
महाआघाडीतूनच उठलेला,
सवालही तसा साधा आहे.
खरा कर्ता करविता धनी कोण?
सांगा काका की दादा आहे ?
संभ्रम कल्लोळ माजलेला,
साक्षीदार दोन हजार चौदा आहे !
भूमिका स्पष्ट केल्यावरही वाटते,
हा तर पहाटेचाच सौदा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8330
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15ऑगस्ट 2023

Monday, August 14, 2023

दैनिक वात्रटिका 14ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे... अंक - 71 वा


दैनिक वात्रटिका
14ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 71 वा
अंक डाऊनलोड लिंक-
 

अच्छे दिन आले आहेत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अच्छे दिन आले आहेत

कुणाला सत्तेत जाऊन,
अच्छे दिन आले आहेत.
कुणाला विरोधात राहून,
अच्छे दिन आले आहेत.

कुणाला फोडाफोडी करून,
अच्छे दिन आले आहेत.
कुणाला तडजोडी करून,
अच्छे दिन आले आहेत.

कुणाला सच्चे बंड करून,
अच्छे दिन आले आहेत.
कुणाला लुच्चे बंड करून,
अच्छे दिन आले आहेत.

कुणाला उसळून घुसळून,
अच्छे दिन आले आहेत !
सगळ्यांनाच मिळून मिसळून,
अच्छे दिन आले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6893
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14ऑगस्ट2023
 

गुप्त भेट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गुप्त भेट

कुणी लपून गेले काय?
कुणी झोपून गेले काय?
गुप्त भेट सुप्त भेट झाली,
त्यात एवढे झाले काय?

त्यांनाही त्यांचे नाते आहे,
त्यांनाही त्यांचे गोते आहे.
भेटले तर भेटू द्या की,
तुमचे का खालीवर होते आहे?

उगीच वावड्या उठवू नका,
त्यांचा घरगुती वाद आहे !
नसत्या चौकश्या करण्याचा,
तुम्हाला ईडीसारखाच नाद आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8329
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14ऑगस्ट 2023
 

Sunday, August 13, 2023

दैनिक वात्रटिका13ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...अंक - 70 वा

दैनिक वात्रटिका
13ऑगस्ट2023....वर्ष- तिसरे...
अंक - 70 वा
अंक डाऊनलोड लिंक -

धोंडा वंदन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
धोंडा वंदन
सासऱ्याच्या राशीत घुसण्याचे,
जणू जावयाला बंधन असते.
जावयाच्या पाचवीला पुजलेले,
चौवार्षिक धोंडावंदन असते.
पाचवीला पुजलेले असले तरी,
तिथे लाभच लाभ ठरलेला असतो !
ज्याचे त्यालाच कळालेले असते,
पदरात कुणी धोंडा मारलेला असतो?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8326
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13ऑगस्ट 2023

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...