Thursday, August 3, 2023

संविधानिक आस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संविधानिक आस

त्यांनाही जोड्याने मारले जाते,
ज्यांना मारायचीही लायकी नाही.
तुम्ही जोडे झिजवता कशाला ?
गृहीत धरायचीही लायकी नाही.

ज्यांनी हातानेच केले तोंड काळे,
त्यांचे तोंड काळे करता कशाला?
त्यांनी आधीच केली द्वेषाची पेरणी,
पुन्हा तुम्हीही तेच पेरता कशाला?

संविधानाचे पाईक आपण,
आपण संविधानाचीच कास धरू !
पाठीराख्यांचेही डोळे उघडतील,
अशी संविधानिक आस धरू !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6882
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3ऑगस्ट2023
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...