आजची वात्रटिका
-------------------------
अमंगल घटका
पहिल्यांदा औरंगजेब,
रस्त्यावरती दिसला.
नंतर मात्र औरंगजेब,
स्टेटसवरती बसला.
मीडियातला ट्रेंड बघून
औरंगजेब कबरीत हसला.
कबरीवरून औरंगजेब,
थेट विधानसभेत घुसला.
औरंगजेबाच्या फेऱ्यातून,
महाराष्ट्राची कुठे सुटका आहे?
औरंगजेबाचे राजकारण,
ही तर अमंगल घटका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8324
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9ऑगस्ट 2023
No comments:
Post a Comment