Thursday, August 10, 2023

राहुलबाबाचा फ्लाईंग किस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राहुलबाबाचा फ्लाईंग किस

आधी मारला संसदेत डोळा,
त्यानंतर जादू की झप्पी आहे.
आता तर आरोप होतोय,
ही हवेतल्या हवेतली पप्पी आहे.

नेहमीसारखीच खासदारकी,
कधी तळ्यात कधी मळ्यात आहे.
आताचा' फ्लाईंग किस ' तर,
विरोधकांच्याच जाळ्यात आहे.

द्वेष भावनेच्या मुकाबल्यासाठी,
म्हणे हे कृतीयुक्त शिक्षण आहे !
काँग्रेस पक्षासाठी मात्र,
हे ' हात ' दाखवून अवलक्षण आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6889
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
10ऑगस्ट2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...