आजची वात्रटिका
-------------------------
चिमणी उडाली....
ट्विटर वरची चिमणी उडाली,
आता तिथे एक्स आहे.
तरीही लोक टिवटिव करणारच,
हे तर अगदी फिक्स आहे.
लोग तो कहेंगे,
लोगो का काम हैं कहना,
हाच इथला एक्स फॅक्टर आहे .
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती,
खरंतर प्रत्येक जण ॲक्टर आहे.
निळी चिमणी,काळे एक्स,
अजून उद्या दुसरे काही असेल !
बदलते लोक,बदलते लोगो,
अंदाज मात्र वही असेल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8317
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1 ऑगस्ट 2023

No comments:
Post a Comment