आजची वात्रटिका
-------------------------
आत्महत्येची पळवाट
यश पचवता आले पण,
अपयश पचवता येत नाही.
गोड घोटांची सवय लागली की
कडू घोट रिचवता येत नाही.
आत्महत्या करणारे बघून,
कुणाचाच विश्वास बसत नाही!
समस्या कुणाचीही असली तरी,
आत्महत्या उपाय असत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8321
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6ऑगस्ट 2023

No comments:
Post a Comment