Sunday, August 27, 2023

त्यांची सर्वत्र शाखा आहे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

त्यांची सर्वत्र शाखा आहे

काल तिकडचे घर फुटले होते,
आज इकडचेही घर फुटते आहे.
याचे तुमच्या माझ्यासकट,
अगदी सर्वांनाच वाईट वाटते आहे.

आपल्याला वाईट वाटते,
याच्यामध्येच तर सगळे आहे.
आपली भावना खरी असली तरी,
पण यातले वास्तव मात्र वेगळे आहे.

त्यांची घरं फुटली असली तरी,
त्यातही घराणेशाहीच्या मेखा आहेत !
काल एकाच पक्षात शाखा होती,
आज मात्र त्यांच्या,
सर्वच पक्षामध्ये शाखा आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6903
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
27ऑगस्ट2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026