Friday, August 4, 2023

नागड्यांची चढाओढ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नागड्यांची चढाओढ

एका नागड्याचे नागडेपण,
दुसरे नागडे झाकायला लागले.
पहिल्या गंभीर प्रकरणावर,
दुसरे पडदा टाकायला लागले.

एक से बढकर एक नागड्यांचे,
सगळे प्रकरणच अजब आहे.
कालच्यापेक्षा आजच्या प्रकरणाचा,
कितीतरी मोठा गहजब आहे.

जुने जाणते म्हणून गेले,
नागड्यांच्या नादी कुणी लागू नये !
कुठवर मिटायचे आपलेच डोळे?
सर्वांनीच उघड्या डोळ्यांनी बघू नये ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6883
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4ऑगस्ट2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...