Friday, August 11, 2023

लोकशाहीचे आकडेशास्त्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
लोकशाहीचे आकडेशास्त्र
अविश्वास ठराव मांडताना,
स्वतःवर विश्वास असावा लागतो.
किमान विश्वासाच्या बाजूने,
आपला आकडा दिसावा लागतो.
लोकशाही भावनेवर नाही,
आकड्यांवरती ठाम उभी आहे.
आकडे वळवा;विश्वास मिळवा,
हीच खरी लोकशाहीची खुबी आहे.
लोकशाहीची झाली आकडेशाही,
कुणी काही वाकडे करू शकत नाहीत!
जोपर्यंत कुठलेही विरोधक,
मजबूत आकडे करू शकत नाहीत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6888
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
11ऑगस्ट2023

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...