Wednesday, August 2, 2023

राजकीय भुल भुलैया.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वाटर टीका


आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय भुल भुलैया

दिसते ते तर कधीच नसते,
जे कधीच नसते;नेमके तेच असते.
या परस्पर विरोधी व्याख्येमध्ये
अगदी पक्के राजकारणच बसते.

वास्तव आणि चमत्कार,
यावर विश्वास ठेवता येत नाही.
राजकीय विश्लेषकांना सुद्धा,
काही अंदाज लावता येत नाही.

पहिला अंदाज लावेपर्यंत,
दुसरेच काही  घडलेले असते !
आपण धक्क्यातून सावरेपर्यंत,
तिसरेच पिल्लू सोडलेले असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8318
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2 ऑगस्ट 2023
-----------------------------------

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...