Tuesday, August 8, 2023

मोबाईल डान्सबार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
मोबाईल डान्सबार
डान्स बार मध्ये गेल्याचे फिलिंग,
मोबाईलही वरती यायला लागले.
डान्स बार मध्ये नोटा उधळव्यात,
तसा अनुभव बोटे द्यायला लागले.
कुणी एखादा म्हणूनही शकतो,
ही कल्पना म्हणजे तर फार झाले.
ज्यांना अनुभव आहेत ते सांगतील,
त्यांच्यासाठी मोबाईल डान्सबार झाले.
जशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत,
मोबाईलवर मेसेजची आदळण आहे!
तशी नोटांऐवजी मोबाईल वरती,
कॉपी पेस्ट फॉरवर्डची उधळण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6887
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
8ऑगस्ट2023

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...