Wednesday, August 9, 2023

चले आव !!...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
चले आव !!
'चले जाव ' च्या नाऱ्या ऐवजी,
आता ' चले आव' चा नारा आहे.
जो येणार नाही त्याच्यामागे,
ईडीच्या साडेसातीचा फेरा आहे.
'क्विट इंडिया 'ची चळवळ तर,
आजसुद्धा मोठ्या जोरात आहे.
जरी ' इंडिया ' म्हणून एकवटले तरी,
धडकी विरोधकांच्या उरात आहे.
लोकशाहीत 'संपूर्ण स्वातंत्र्य' नाही,
अशी विरोधकांची डागणी आहे !
आजही संपूर्ण स्वातंत्र्याची,
विरोधकांकडून नवी मागणी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6888
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9ऑगस्ट2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका9मे2024....वर्ष- तिसरे..अंक -337 वा

दैनिक वात्रटिका 9मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -337 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1YKcJAplgFQ_Yy4Y-iGAd4-zID...