Tuesday, August 1, 2023

वैचारिक घसरगुंडी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

वैचारिक घसरगुंडी

ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी,
महापुरुष वाटून घेतले आहेत.
फायदे लाटून घेता घेतानाच,
दुकानही थाटून घेतले आहेत.

अमुक महापुरुष आमचे आहेत,
तमुक महापुरुष आमचे आहेत.
असे म्हणणारे अनुयायी नाहीत,
हे सगळेच निव्वळ चमचे आहेत.

एकमेकांच्या महापुरुषावर,
हेच आंधळे भक्त घसरत आहेत !
महापुरुष कुणाची मालमत्ता नाहीत,
हेच जाणीवपूर्वक विसरत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6880
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
1ऑगस्ट2023
 

No comments:

विकासाचा देखावा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- विकासाचा देखावा वास्तवाला अवास्तवाचा, बेमालूम मुलामा दिला जातो. भकास नावाचा कार्यक्रम, विकास म्हणून उभा क...