Monday, August 7, 2023

अमित शहांची पुणे भेट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
अमित शहांची पुणे भेट
ऐन धोंड्याच्या महिन्यामध्ये,
जावई इथे येऊन गेला आहे.
महाराष्ट्र अभिमानाने सांगतोय,
"जावई माझा भला आहे."
राजकीय भूकंप होईल तेव्हा होईल,
बातम्यांना ना बुडखा,ना शेंडा आहे.
जावई म्हणजे तर दहावा ग्रह,
बघुयात कुणाच्या पदरात 'धोंडा' आहे?
आखाडसासू बोले आखाडसासऱ्याला,
मुत्सद्दी अशी जावयाची जात आहे !
महाराष्ट्राच्या राजकीय ' पार्टी ' शन मागे,
जावयाचाच तर भला मोठा हात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6885
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7ऑगस्ट2023

 

No comments:

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- फूट आणि विलीनीकरण फुटीनंतर विलीनीकरण असते, विलीनीकरणानंतर फूट असते. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,...