आजची वात्रटिका
-------------------------
तिरस्काराकडून पुरस्काराकडे
ज्यांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप,
ज्यांच्याकडून राजकीय तिरस्कार आहे.
त्यांच्याच हातामध्ये यांच्याकडून,
लोकमान्य टिळक पुरस्कार आहे.
ऐंशी टक्के राजकारणापेक्षा,
वीस टक्के समाजकारणाचा चेक आहे.
ह्या पुरस्काराच्या सोपस्कारामध्ये,
जणू न दिसलेली राजकीय मेख आहे.
महाराष्ट्रातला हा पुरस्कार सोहळा,
तमाम 'इंडिया' ने पाहिला आहे !
आमचेच डोके ठिकाणावर नाही,
एवढाच कबुली जवाब राहिला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6881
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
2ऑगस्ट2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- खोके आणि धोके खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे. खोक्या आणि धोक्याच...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment