आजची वात्रटिका
-------------------------
आरोपांचे पाढे
परस्परांच्या आरोपांचे,
पाढे वाचायला लागले.
एकमेकांचे पाढे ऐकून,
पाढे सुचायला लागले.
कुणाचे पाढे छोटे आहेत,
कुणाचे पाढे मोठे आहेत.
एकमेकांवरती आरोप,
वाचलेले पाढे खोटे आहेत.
आरोपांच्या पाढ्यांचा,
पारंपरिक कलगी-तुरा आहे !
ज्यांच्या हाती सत्ता,
त्यांचा मात्र तोरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8325
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10ऑगस्ट 2023

No comments:
Post a Comment