Saturday, August 12, 2023

डोळ्यांची साथ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

-------------------------

डोळ्यांची साथ

याचे त्याचे बघून बघून,
पोटामध्ये गोळे आले आहेत.
बघता बघता सगळ्यांचेच,
एकदाचे डोळे आले आहेत

कोरोनाच्या साथीवर,
डोळ्यांची मात आहे.
पूर्वी नाकातून होता,
आत्ता डोळ्यातून घात आहे.

जणू कोरानाचे जावून,
डोळ्यावर आले आहे !
व्हायरल इन्फेक्शन,
नित्याचेच झाले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8327
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12ऑगस्ट 2023

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...