Sunday, August 6, 2023

शिक्षण 'खात्याची' बदनामी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शिक्षण 'खात्याची' बदनामी

विद्या आणि विनय कुठे शोभतो?
नाव मोठे लक्षण खोटे होते आहे.
रोजच भ्रष्टाचारामुळे बदनाम,
आपले शिक्षण खाते होते आहे.

मूल्य शिक्षणाची पाटी लावून,
इथे शिक्षणाचे 'मूल्य' उपटले जाते.
प्रत्यक्ष गुरूकडून दक्षिणा घेऊनही,
त्याला हेलपाट्यांनी हेलपाटले जाते.

गुरु - दक्षिणा वसुलीसाठी,
वसुली मास्तरांच्या साखळ्या आहेत !
ज्या त्या स्तारावरच्या प्रत्येकाला,
फुलासह फुलाच्या पाकळ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6885
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6ऑगस्ट2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका9मे2024....वर्ष- तिसरे..अंक -337 वा

दैनिक वात्रटिका 9मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -337 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1YKcJAplgFQ_Yy4Y-iGAd4-zID...