Saturday, August 5, 2023

महागद्दार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

महागद्दार

महाराष्ट्रामध्ये नावाप्रमाणेच,
बघा सगळेच कसे महा आहेत.
महाराष्ट्रामध्ये महागद्दार आहेत,
जणू जे गद्दारांचे शहनशहा आहेत.

स्तुतीसाठी आणि टीकेसाठीही
महा हे पालूद वापरले जाते आहे
महा ह्या एका पालूपदाने,
हातभराचे थेट वितभर होते आहे.

अधिवेशनापासून गद्दारापर्यंत,
सध्या सर्वत्र महाचीच रेलचेल आहे !
अधिवेशनाच्या मोसमामध्ये,
' महा ' पालूपदाचा महासेल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6884
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5ऑगस्ट2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...