Friday, August 11, 2023

वैचारिक शूद्रता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

वैचारिक शूद्रता

वैचारिक मतभेद असणाऱ्यांचे,
मृत्यूनंतर ही वैर संपत नाही.
आम्ही काही उगीच कुणावरती,
आरोपांचे शिंतोडे शिंपत नाही.

आपल्या शूद्र मानसिकतेचे,
ते वेळोवेळी दर्शन घडवत राहतात !
पहिल्यापेक्षा जास्त शिंतोडे,
ते मृत्यूनंतर उडवत राहतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8326
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11ऑगस्ट 2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...