Tuesday, August 8, 2023

अफवांचे सत्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

अफवांचे सत्य

लुटायचे तेवढे लुटून झाले,
फुटायचे तेवढे फुटून झाले,
तरीही नव्या फुटीचे वृत्त,
कसे आणि कुठून आले?

अफवा पेरल्या जातात,
अफवा माथी मारल्या जातात.
दुर्दैवानं सत्य हे की,
अफवाच खऱ्या ठरल्या जातात.

सत्याला अफवा महावे लागते,
अफवांना सत्य म्हणावे लागते !
ज्यांच्याबाबत हे खरे ठरते,
त्यांना केवळ कण्हावे लागते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8323
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8ऑगस्ट 2023
 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...