Saturday, August 12, 2023

खड्डेस्तान...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

खड्डेस्तान

आता रस्त्यावरच्या खड्ड्यांना,
जणू मोकळेच रान झालेले आहे.
रस्ते रस्तेच राहिले नाहीत,
तिथे आता खड्डेस्तान झालेले आहे.

रस्त्या - रस्त्यावर भरलेला,
खड्ड्यांचा अड्डा वाटतो आहे.
रोज नवा दिवस;नवा अनुभव,
खड्ड्यालाच खड्डा फुटतो आहे.

जसा नेमीची येतो पावसाळा,
तसा खड्ड्यांचाही ऋतू आहे !
खड्ड्यातून उडणारा रेंदा म्हणजे,
सिस्टिमवरतीच छी थू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6891
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
12ऑगस्ट2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका9मे2024....वर्ष- तिसरे..अंक -337 वा

दैनिक वात्रटिका 9मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -337 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1YKcJAplgFQ_Yy4Y-iGAd4-zID...