Monday, August 7, 2023

शॉकप्रूफ जनता....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शॉकप्रूफ जनता

राजकीय भूकंपाचे धक्के बसून,
जनताही आता शॉकप्रूफ झाली आहे.
प्रत्यक्ष राजकीय भूकंपावरतीच,
धक्के बसायची पाळी आली आहे.

त्यांच्यासाठी मात्र तो भूकंप असतो,
त्यांच्यासाठीच मात्र तो शॉक आहे !
जे असतात हरीणकाळजाचे,
ज्यांच्या काळजात धाक धाक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8322
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6ऑगस्ट 2023
 

No comments:

daily vatratika..9may2024