Friday, July 31, 2020

पटतंय का बघा?

आजची वात्रटिका
----------------------------
पटतंय का बघा?
हे नागडे वास्तव आहे,
ही काही गंमत-बिंमत नाही.
माणसाला माणसाजवळ
आणण्याची
कोरोनाच्या बापात हिंमत नाही.
माणूस नावाची गोष्ट,
केंव्हाच भुर्ररss गेली आहे .
उरली ती दोन पायांची श्वापदे,
माणूसकी खुर्ररss झाली आहे.
नियमाला अपवाद आहेत,
त्यांना मात्र सलाम आहेत !
कोरोना काय करणार ?
माणसे सवयीचे गुलाम आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7360
दैनिक झुंजार नेता
31जुलै 2020

लेखकरावांनो...

आजची वात्रटिका
----------------------------
लेखकरावांनो...
हश्या, टाळ्या खूप झाल्या,
लेखणीची वज्रमूठ करा.
काळाची गरज आहे,
नव्या विचारांचे सुरुंग पेरा.
फोडून काढा तटबंद्या,
नवविचारांचे तेज घुमू द्या !
दांभिकांच्या कानी कपाळी,
परिवर्तनाचा शंख रोज घुमू द्या !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5875
दैनिक पुण्यनगरी
31जुलै2020

Thursday, July 30, 2020

धास्ती आणि मस्ती

आजची वात्रटिका
----------------------------
धास्ती आणि मस्ती
कुणामध्ये धास्ती आहे,
कुणामध्ये मस्ती आहे.
मस्तवाल दाखवू लागले,
जिंदगी किती सस्ती आहे.
धास्ती हवी,मस्ती नको,
एवढे तरी भान हवे आहे !
नाहीतरी कोरोनाला,
मोकळे रान हवे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7359
दैनिक झुंजार नेता
30जुलै 2020
-----------------------------
#कोरोना

ओल्ड इज गोल्ड

आजची वात्रटिका
----------------------------
ओल्ड इज गोल्ड
कोरोनाने सगळे लोक,
स्वावलंबी बनले आहेत.
कोरोनाने जुने दिवस,
परत आणले आहेत.
जुन्या दूरदर्शन मालिका,
यामध्ये सर्वात पुढे आहेत !
ओल्ड इज गोल्डचे,
सर्वांच्या तोंडी पाढे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5874
दैनिक पुण्यनगरी
30जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Wednesday, July 29, 2020

रस्सीखेच

आजची वात्रटिका
----------------------------
रस्सीखेच
अनेक थोरामोठयांचे योगदान,
सरळ नाकारले जाऊ लागले.
आपापल्या सोयीनुसार,
महात्मे साकारले जाऊ लागले.
समर्थक आणि विरोधकांची,
यात रस्सीखेच लागली आहे !
त्यांनी तर शहाणे व्हावे,
ज्यांना जोरात ठेच लागली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7358
दैनिक झुंजार नेता
29जुलै 2020

सुटकेचा मार्ग

आजची वात्रटिका
----------------------------
सुटकेचा मार्ग
खरा दिलासा देणारांना,
फुरोगामी म्हणून हिणवू नका.
लोकांना खोटे दिलासे देऊन,
त्यांना दैववादी बनवू नका.
खऱ्या-खोट्याची परीक्षा,
कोरोना घडोघडी बघतो आहे !
ज्याचा स्वतःवर विश्वास,
तो कोरोनातून बाहेर निघतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5873
दैनिक पुण्यनगरी
29जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Tuesday, July 28, 2020

कल्पना विस्तार

आजची वात्रटिका
----------------------------
कल्पना विस्तार
एक मालक आहे,
दुसरा चालक आहे,
तिसऱ्या पालकाला वाटते,
चालक अजून बालक आहे.
तरी तीन चाकी रिक्षाचे,
मीटर मात्र जोरात आहे !
ही रिक्षाची कल्पना,
त्यांच्याच तर सुरात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7357
दैनिक झुंजार नेता
28जुलै 20200

कोरोनाचे मूल्यमापन

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचे मूल्यमापन
रोज नव्या नव्या धक्क्यांनी,
जरी समाज हादरत आहे.
तरी कोरोनाच्या दहशतीने,
वेगाने समाज सुधरत आहे.
सामाजिक सुधारणांना,
कोरोनाची खूप चालना आहे!
कोरोना शाप की वरदान?
संपूर्ण जगात तुलना आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7356
दैनिक झुंजार नेता
27जुलै 2020
-----------------------------
#कोरोना

रिक्षावाल्याचा विचार

आजची वात्रटिका
----------------------------
रिक्षावाल्याचा विचार
कधी वाटते आपले आहे,
कधी वाटते लोकांचे आहे.
आपल्या रिक्षासारखेच,
सरकार तीन चाकांचे आहे.
चाके तीन असले तरी,
एकच स्टेअरींग आहे !
सरकार म्हणजे काय?
पॅसेंजरसारखी शेअरींग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5871
दैनिक पुण्यनगरी
27जुलै2020

कोरोना पॅटर्न

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोना पॅटर्न
मारा आणि मरू द्या,
हा कोरोनाचा नारा आहे.
कोरोनाच्या पॅटर्न मध्ये,
कुठे कशाला थारा आहे?
मारणारा आणि तारणारा,
पॅटर्नमध्ये गुंगलेला आहे !
रोगापेक्षा उपाय जालीम,
समज गैरसमज पांगलेला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5872
दैनिक पुण्यनगरी
28जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Sunday, July 26, 2020

नागोबाचे मनोगत

आजची वात्रटिका
----------------------------
नागोबाचे मनोगत
ना कुणी टाकल्या लाह्या,
ना कुणी दूध ओतले नाही.
कोरोनामुळे संकट टळले,
आम्ही ऑब्जेक्शन घेतले नाही.
बिळात दडून राहायची,
आमच्यासारखी वेळ न येवो !
दरवर्षी सण आणि उत्सवांचा,
असा सापशिडीचा खेळ न होवो!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5870
दैनिक पुण्यनगरी
26जुलै2020
-----------------------------
#कोरोना

कोरोनाचे भांडवल

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचे भांडवल
ज्यांना संध्या साधता येतात,
त्यांनी संध्या साधल्या आहेत.
आतातर टीव्ही मालिकाही,
कोरोनाने जाम बाधल्या आहेत.
जो आडवा आला होतो,
त्याचेच आता भांडवल आहे !
'डेली एपिसोड'च्या कथानकात,
कोरोनाचा मोठा रोल आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7355
दैनिक झुंजार नेता
26जुलै 2020
-----------------------------
#कोरोना

पाकीस्तानचा कंड

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
---------------------
कंड पाकिस्तानचा
आमच्या शस्त्रसंधीचा,
ते फायदा घेऊ लागले.
ज्यांच्यावर विश्वास ठेवावा,
तेच धोका देऊ लागले.
६५,७१ आणि कारगिल,
सांगा कितीदा कंड जिरवायचा ?
का हिरोशिमा नागासाकीचा धडा,
पुन्हा एकदा गिरवायचा ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
पूर्वप्रसिद्धी-
फेरफटका-394
दैनिक झुंजार नेता
18जानेवारी2002

Saturday, July 25, 2020

कोंडी

आजची वात्रटिका
----------------------------
कोंडी
असे काही नाही की,
कोरोनाशिवाय दुसरा विषय,
चघळताच येत नाही.
पण हेही तितकेच खरे की,
कोरोनाला वगळताच येत नाही.
कोरोना विषय चघळायची,
कुठे कुणाला चटक आहे ?
पण हे मात्र कटू सत्य आहे,
कोरोना अविभाज्य घटक आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7354
दैनिक झुंजार नेता
25जुलै 2020
-----------------------------

फाटक्यात पाय

आजची वात्रटिका
----------------------------
फाटक्यात पाय
एक एक व्यक्ती म्हणजे,
खरोखरच वल्ली आहे.
कोरोनाच्या लॉक डाऊनची,
जमेल तशी पायमल्ली आहे.
ये रे उद्योगा,बस खांद्यावर,
असेच नाही तर काय आहे ?
दुसरे तिसरे काही नाही,
हा फाटक्यात पाय आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5869
दैनिक पुण्यनगरी
25जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Friday, July 24, 2020

बेकारीचे दिवस

आजची वात्रटिका
----------------------------
बेकारीचे दिवस
उतावळे बावळे कार्यकर्ते,
एकदम बेचैन झाले आहेत.
कोरोनामुळे त्यांच्यावरही,
बेकारीचे दिवस आले आहेत.
निष्ठादर्शन करावे तरी कसे?
त्यांच्या समोर प्रश्न उभा आहे !
कॉपी-पेस्ट सुभेदारांसाठी खुला,
सोशल मीडियाचा सुभा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7353
दैनिक झुंजार नेता
24जुलै 2020
-----------------------------
#कोरोना

भयगंड

आजची वात्रटिका
----------------------------
भयगंड
सारासार विवेक तर सोडाच,
अविवेकाचीच धुंदी आहे.
कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीस,
स्मशानातसुद्धा बंदी आहे.
कोरोनाच्या भयगंडामुळे
हा प्रकार झालेला दिसू शकतो !
पण हे विसरून कसे चालेल,
उद्या आपला नंबर असू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5868
दैनिक पुण्यनगरी
24जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Thursday, July 23, 2020

दावेदारीचे रामायण

आजची वात्रटिका
----------------------------
दावेदारीचे रामायण
आम्हीच विमानाचे संशोधक,
श्रीलंनकेचा दशाननी दावा आहे.
खरी अयोध्या आमच्याकडेच,
नकट्या नेपाळचा शोध नवा आहे.
दावेदारीचे रामायण,
आशियात जोरात रंगले आहे !
पाकिस्ताचे काही खोदकाम नाही,
एवढे तरी त्यात चांगले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7352
दैनिक झुंजार नेता
23जुलै 2020
-----------------------------
#कोरोना

कोरोनाचा 'वाढ'दिवस

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचा 'वाढ'दिवस
कोरोना म्हणाला कोरोनाला,
हॅपी बर्थ डे टू यु !
सांग तुला किती पॉझिटिव्ह,
आज गिफ़्ट म्हणून देऊ ?
ना आपल्याला कार्यकर्ते आहेत ,
ना आपण राजकीय नेते आहोत !
बचेंगे तो और भी पसरेंगे,
जोपर्यंत आपण जित्ते आहोत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5867
दैनिक पुण्यनगरी
23जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Wednesday, July 22, 2020

आला श्रावण श्रावण

आजची वात्रटिका
----------------------------
आला श्रावण श्रावण
आलेली संधी काही,
कोरोना टाळीत नाही
ब्रेकींग न्यूज अशी की,
तो श्रावण पाळीत नाही.
कुणाचा उपास निरंक,
कुणाचा एकूळ आहे!
आयत्या शिकारीसाठी,
कोरोना व्याकूळ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7351
दैनिक झुंजार नेता
22जुलै 2020
-----------------------------
#कोरोना

कोरोनाची हवा

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाची हवा
त्याला कोरोना बाधू शकतो,
जो मास्क घालयाला विसरू शकतो.
आता कोरोना हवेद्वारे,
पुढून आणि मागून पसरू शकतो.
सगळ्या जगाचाच दावा आहे,
आजतरी कोरोनाचीच हवा आहे !
उपचाराऐवजी सुरक्षा,
कोरोनावर एवढाच दवा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5866
दैनिक पुण्यनगरी
22जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Tuesday, July 21, 2020

राजकीय शिकवण,

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय शिकवण
सगळे काही शांत शांत,
सगळे काही ठप्प ठप्प आहे.
उद्याचा भरवसा नसतानाही,
राजकारण कुठे गप्प आहे?
कोरोनाच्या आयत्या संधीचे
राजकारण्यांकडून सोने आहे !
संकटातही संधी शोधता येते,
हे त्यांच्या शिकवणीचे देणे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5865
दैनिक पुण्यनगरी
21जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Monday, July 20, 2020

कोरोनातली गटारी

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनातली गटारी
कुणी जोरात झिंगत होते,
कुणी जोरात पेंगत होते.
कोरोना गेला,कोरोना गेला,
पेताड पेताडांना सांगत होते.
उद्या कोरोना टिकला तर,
या आठवणी सांगत राहील !
गटारीच्या आठवणीचा सुगंध,
पिढ्यान पिढ्या पांगत जाईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7348
दैनिक झुंजार नेता
20जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

समूह संसर्ग

आजची वात्रटिका
----------------------------
समूह संसर्ग
एकाच्या भावना दुखावताच,
दुसऱ्याच्याही दुखवू लागतात.
भावनिक लाटेवर स्वार होऊन,
नको त्या कंड्या पिकवू लागतात.
फक्त मुर्दाबाद,जिंदाबादच्या गोष्टी,
त्यांना शिकवलेल्या असतात !
बहुतेकांना हेही माहीत नसते,
आपल्या भावना का?
आणि कशाने दुखावलेल्या असतात?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5864
दैनिक पुण्यनगरी
20जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Sunday, July 19, 2020

भावनिक खेळ

आजची वात्रटिका
----------------------------
भावनिक खेळ
लोकांच्या गमती-जमती,
तुम्हांला कुठे ठाऊक होतात?
मुर्दाड वाटणारे लोक,
तसे कमालीचे भावूक होतात.
भावनांचे सुखावणे-दुखावणे,
यात नेहमीच गडबड असते !
त्याचेही भांडवल केले जाते,
जी वायफळ बडबड असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7347
दैनिक झुंजार नेता
19जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

प्रशासकपद विकणे आहे

आजची वात्रटिका
----------------------------
प्रशासकपद विकणे आहे
नवी रोख-ठोकशाही,
गावोगावी शिकू लागले.
सरपंचपदांच्या विक्रीनंतर
प्रसासकपद विकू लागले.
गाव बोले,लिलाव चाले,
असेच याचे सार आहे !
आज रोख,उद्या उधार,
असा रोख-ठोक व्यवहार आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5863
दैनिक पुण्यनगरी
19जुलै2020

Saturday, July 18, 2020

कोरोना स्टोरी

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोना स्टोरी
विश्वास आणि अविश्वास,
ठेवायचीही चोरी आहे.
कोरानाच्या पराक्रमाची,
रोज नवनवी स्टोरी आहे.
कोरोनाच्या स्टोरीला,
रोज नवनवे वळण आहे !
साऱ्या जगाचीच,
सध्या भीतीने गाळण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7347
दैनिक झुंजार नेता
18जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

ऐतिहासिक योगदान

आजची वात्रटिका
----------------------------
ऐतिहासिक योगदान
जाती-धर्माचा चष्मा लावून,
इतिहास नव्याने खोदू लागले.
आपल्या जाती-धर्माचे योगदान,
इतिहासात नव्याने शोधू लागले.
बलिदान आणि योगदान,
कुणीही नाकारणे योग्य नाही.
जाती-धर्माच्या शिक्क्यानिशी,
कुणीही स्विकारणे योग्य नाही.
कुणी ना ठराविक धर्माचे,
ना कुणी ठराविक जातीचे होते!
ज्ञात-अज्ञात आणि उपेक्षित,
ते सारे भारतीय मातीचे होते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5862
दैनिक पुण्यनगरी
18जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Friday, July 17, 2020

यश-अपयश

आजची वात्रटिका
----------------------------
यश-अपयश
कुणाच्या वाट्याला यश,
कुणाच्या वाट्याला अपयश येते.
आलेल्या यश-अपयशाची,
सवयीप्रमाणे तुलना होते.
यश -अपयशाची तुलना,
ही प्रगतीची वैरी आहे !
यावेळी हा सुविचार कुठे जातो?
अपयश ही यशाची पायरी आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5861
दैनिक पुण्यनगरी
17जुलै2020

अभिनंदन !

आजची वात्रटिका
----------------------------
अभिनंदन !
आम्ही यश आणि अपयश
या दोघांनाही वंदन करतो.
यशस्वी आणि अयशस्वी,
दोघांचेही अभिनंदन करतो.
यशाने हुरळू नका,
अपयशावर काहीही बरळू नका.
शब्दांचेही विष होईल,
असे काहीबाही गरळू नका.
यशाचे जसे वाटेकरी होतो,
तशे अपयशाचेही होऊ या !
आत्मविश्वास आणि बळ,
यश-अपयशालाही देऊ या !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7346
दैनिक झुंजार नेता
17जुलै 2020

Thursday, July 16, 2020

ऑनलाईन शिक्षण

आजची वात्रटिका
----------------------------
ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण,
ही अडथळ्यांची शर्यत आहे.
ज्याला जसा गिरवता येईल,
तसा तो धडा गिरवत आहे.
जमता जमता जमेल,
याचयात काही वाद नाही !
आनंदाची गोष्ट अशी की,
यात छडीचा प्रसाद नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7345
दैनिक झुंजार नेता
16जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

फेसबुक लाईव्ह

आजची वात्रटिका
-----------------------------
फेसबुक लाईव्ह
टांगणीला लागलेला
प्रत्येकाचा जीव आहे.
आता प्रत्येकच गोष्ट,
फेसबुक लाईव्ह आहे.
ऑनलाईन जगण्याचे,
कोरोनाकडून शिक्षण आहे !
फेसबुक लाईव्ह,
हे जीवंतपणाचे लक्षण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5860
दैनिक पुण्यनगरी
16जुलै2020
-----------------------
#कोरोना

Wednesday, July 15, 2020

घरगुती सुख

आजची वात्रटिका
-----------------------------
घरगुती सुख
आकड्यानिशी सिद्ध झाले,
कोरोना किती द्वाड आहे?
कौटुंबिक हिंसाचारात,
कोरोनामुळे वाढ आहे.
हा संशोधनाचा मुद्दा,
कोण कुणाला छळते आहे ?
बाहेरचे पर्याय बंद झाल्याने,
घरगुती सुख कळते आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5859
दैनिक पुण्यनगरी
15जुलै2020
-----------------------
#कोरोना

हम होंगे कामयाब..

आजची वात्रटिका
-----------------------------
हम होंगे कामयाब..
कोरोनाला हरवू शकतो,
हा विश्वास खरा होतो आहे.
कोरोनाची लस नाही तरी,
पेशंट बरा होतो आहे.
कोरोनाच्या दहशतीचा,
उठता-बसता ढोस आहे!
आत्मविश्वास हीच लस,
आत्मविश्वास हाच डोस आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7344
दैनिक झुंजार नेता
15जुलै 2020
-----------------------------
-#कोरोना

Tuesday, July 14, 2020

कोरोना युग

आजची वात्रटिका
-----------------------------
कोरोना युग
शास्त्रातून सवड,
आपोआप निघू शकते.
नवरीशिवाय लग्न लागते,
तर वऱ्हाडाविना भागू शकते.
बदलू लागले नियम,
बदलले जग आहे !
कोरोनाच्या मालकीचे,
हे पाचवे युग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7343
दैनिक झुंजार नेता
14जुलै 2020
-----------------------------
-#कोरोना

कोरोनाची धुम्मस

आजची वात्रटिका
-----------------------------
कोरोनाची धुम्मस
कोरोनाची कोरोनाशी,
प्रथमच धुम्मस आहे.
आपल्यापेक्षाही भारतात,
अमिताभ फेमस आहे?
नाना वटवटी केल्या तरी,
कोरोना कुठे राजी आहे ?
भारतात कोरोना ची उंची,
'बिग बी' पेक्षा खुजी आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5858
दैनिक पुण्यनगरी
14जुलै2020
--------------------------------------
-#कोरोना

Monday, July 13, 2020

कोरोनाची खळबळ

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाची खळबळ
आता नाटकी कोरोना,
फिल्मी ग्राहक शोधीत आहे.
अमिताभच्या 'जलसा'सोबत,
रेखाचा 'सी स्प्रिंग' बाधीत आहे.
राजभवनाचीही सुरक्षा,
कोरोनाने तोडली आहे !
तुमच्या-आमच्यासारख्यांची
पुरती खळबळ उडली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7342
दैनिक झुंजार नेता
13जुलै 2020
------–------------------------------

इशाराही काफी हैं...

आजची वात्रटिका
-----------------------------
इशाराही काफी हैं...
अमिताभला झाला कोरोना,
रेखा होम क्वारंटाईन आहे.
मीडियाच्या हेडलाईनमध्येच,
खरोखर 'पंचलाईन' आहे.
आराध्या-अभिषेक सुरू झाले,
कारण तो 'महानायक' आहे.
आपले काय होऊ शकते?
कल्पना न करण्यालायक आहे.
जया अंगी 'बिग बी' पणा,
कोरोना त्याच्याही घरी आहे !
आपली बहादूरी बाहेर नको;
आपली आपण,
घरात घातलेलीच बरी आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5857
दैनिक पुण्यनगरी
13जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Sunday, July 12, 2020

कोरोनाचा झेंडा

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचा झेंडा
जसा आमचा वेगळा आहे,
तसा तुमचाही वेगळा आहे.
आजकालचा लॉकडाऊन,
पहिल्यापेक्षा आगळा आहे.
आरोग्याबरोबर मानसिकतेचा,
क्षणोक्षणी गंडा आहे !
अनलॉक आणि लॉकडाऊनमध्ये,
कोरोनाचाच झेंडा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7341
दैनिक झुंजार नेता
12जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

योगायोग

आजची वात्रटिका
----------------------------
योगायोग
जेंव्हा सोयीच्या प्रश्नांना,
सोयीचेच उत्तर येते.
तेंव्हा गटारगंगेचे पाणीही,
आपोआप अत्तर होते.
गटारगंगेच्या पाण्याचा,
कानोकानी फाया असतो !
खऱ्याच्या बुडाखाली,
खोट्याचाच पाया असतो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5856
दैनिक पुण्यनगरी
12जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Saturday, July 11, 2020

नाविलाज

आजची वात्रटिका
----------------------------
नाविलाज
कोरोनाने नवा विचार,
पचवायला शिकवले आहे.
जे जे रुचत नाही,
ते रुचवायला शिकवले आहे.
कोरोनाचे हे रूप,
बरेच काही सूचक आहे !
कोरोना पचनी पडतोय,
जरी कोरोना जाचक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7340
दैनिक झुंजार नेता
11जुलै 2020
--------------------------------

एन्काऊंटर

आजची वात्रटिका
----------------------------
एन्काऊंटर
एन्काऊंटर म्हटले की,
संशयाचे ढग दाटून येतात.
हाच खरा न्याय आहे,
असेही लोक वाटून घेतात.
न्याय त्वरीत मिळावा,
पण एन्काऊंटरचे नाटक नको !
बंदुकीच्या गोळीला,
एन्काऊंटरची चटक नको !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5855
दैनिक पुण्यनगरी
11जुलै2020
----------------------------------------
#कोरोना

Friday, July 10, 2020

मुस्कटदाबी

आजची वात्रटिका
----------------------------
मुस्कटदाबी
ना दवा, ना दुवा आहे,
सर्वत्र कोरोनाची हवा आहे.
कोरोना हवेतून पसरतो,
पुराव्यानिशी दावा आहे.
नाहीतरी कोरोनामुले,
रोज नवी समस्या उभी आहे !
नाहीतरी कोरोनाकडून,
शब्दशः मुस्कटदाबी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7339
दैनिक झुंजार नेता
10जुलै 2020
----------------------------------------
#कोरोना

देवाक काळजी...

आजची वात्रटिका
----------------------------
देवाक काळजी...
कोरोनाच्या धक्केबाजीला,
आपण कुठे विसरू शकतो?
यावरही शिक्कामोर्तब झाले,
तो हवेतूनही पसरू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेचाही,
हवाई संसर्गाला हवाला आहे !
आता नास्तिकही म्हणू नयेत,
आपली काळजी देवाला आहे !
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5854
दैनिक पुण्यनगरी
10जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Thursday, July 9, 2020

अशास्त्रीय विचार

आजची वात्रटिका
------------------------------
अशास्त्रीय विचार
एखादा प्रश्नव मुळात,
आपल्या बौद्धिक सत्त्वाचा असतो.
अभ्यासक्रमातील एखादा धडा म्हणे,
कमी-अधिक महत्त्वाचा असतो.
फक्त एखादा धडाच नाही,
विषयलाही कमी लेखले जाते !
सुजाण नागरीक घडवायचे,
शास्त्रही अडगळीत टाकले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7338
दैनिक झुंजार नेता
9जुलै 2020

तहनामा

आजची वात्रटिका
----------------------------
तहनामा
राजकीय पक्षांतराचे,
कुणाला काहीच वाटत नाही.
बाटा-बाटी कालबाह्य झाली,
त्यामुळे कुणीच बाटत नाही.
जे पदरी पडतात,
ते पवित्र केले जातात !
राजकीय तह झाले की,
गुलाम परत दिले जातात !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5853
दैनिक पुण्यनगरी
9जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Wednesday, July 8, 2020

हवाई सफर

आजची वात्रटिका
----------------------------
हवाई सफर
कोरोनामुळे अगोदरच,
सगळी अफरातफर आहे.
तोपर्यंत नवी बातमी आली,
कोरोनाची हवाई सफर आहे.
कोरोनामुळे अगोदरच,
पळता भुई थोडी आहे !
कुणीतरी दिलासा द्यारे,
ही बातमी खरी नाही,
ही चक्क पुडी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7337
दैनिक झुंजार नेता
8जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...