Saturday, July 18, 2020

ऐतिहासिक योगदान

आजची वात्रटिका
----------------------------
ऐतिहासिक योगदान
जाती-धर्माचा चष्मा लावून,
इतिहास नव्याने खोदू लागले.
आपल्या जाती-धर्माचे योगदान,
इतिहासात नव्याने शोधू लागले.
बलिदान आणि योगदान,
कुणीही नाकारणे योग्य नाही.
जाती-धर्माच्या शिक्क्यानिशी,
कुणीही स्विकारणे योग्य नाही.
कुणी ना ठराविक धर्माचे,
ना कुणी ठराविक जातीचे होते!
ज्ञात-अज्ञात आणि उपेक्षित,
ते सारे भारतीय मातीचे होते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5862
दैनिक पुण्यनगरी
18जुलै2020
--------------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...