Sunday, July 19, 2020

प्रशासकपद विकणे आहे

आजची वात्रटिका
----------------------------
प्रशासकपद विकणे आहे
नवी रोख-ठोकशाही,
गावोगावी शिकू लागले.
सरपंचपदांच्या विक्रीनंतर
प्रसासकपद विकू लागले.
गाव बोले,लिलाव चाले,
असेच याचे सार आहे !
आज रोख,उद्या उधार,
असा रोख-ठोक व्यवहार आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5863
दैनिक पुण्यनगरी
19जुलै2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 9 ऑगस्ट 2026वर्ष- सहावे अंक - 37 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...