Friday, March 31, 2023

समाजकंटक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

समाजकंटक

जेव्हा सामाजिक शांततेला,
कचकन नख लागते.
आपल्याला वाटते दुःख,
समाजकंटकांना सुख लागते.

जेव्हा समाजकंटक,
समाजकंटकांना टोचू लागतात.
समाजकंटकांचे आरोप,
समाजकंटकांनाच बोचू लागतात.

शांतता धोक्यात आणणे,
हा समाजकंटकांचा छंद असतो!
कायदा सुव्यवस्था बिघडली की,
त्यांचा आनंदी आनंद असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8216
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
31मार्च2023
 

सुप्रीम कोर्टाचा शेरा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सुप्रीम कोर्टाचा शेरा

ना 'तो' आहे,ना 'ती' आहे,
सरकार तर म्हणे 'ते' आहे.
यावरूनच लक्षात येईल,
सरकारचे लिंग कोणते आहे?

कुणाचा हशा;कुणाच्या टाळ्या,
कुणाचा चेहरा गोरामोरा आहे!
हा काही व्याकरणाचा तास नाही,
हा तर सुप्रीम कोर्टाचा शेरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6763
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
31मार्च2023
 

Thursday, March 30, 2023

आपली आयपीएल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

आपली आयपीएल

पैसा पाणी, दंगा मस्ती,
यांचा राजकारणात ढीग आहे.
आपली राजकीय संस्कृती म्हणजे,
इंडियन पॉलिटिकल लीग आहे.

झटपट नेता होण्याचीच,
इथल्या प्रत्येकाची इच्छा आहे!
काहीही करा;कसे ही जिंका,
महत्वाकांक्षेचाच पिच्छा आहे.

आपले आयपीएल म्हणजे,
मटका जुगार अड्डा आहे !
तोही स्वतःला तरुण समजतो,
जो जो जख्खड बुढ्ढा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8215
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30मार्च2023
 

खेलो इंडिया...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

खेलो इंडिया...

कायदेशीर संरक्षणाची,
जाहिरातदारांना हमी आहे.
बोकाळलेल्या जाहिरातीमध्ये,
रम,रमा आणि रमी आहे.

जे जे विकते; ते ते पिकते,
हा मार्केटिंगचा फंडा आहे.
हसव्या फसव्या जाहिरातींचा,
मामा बनलेल्यांना गंडा आहे.

गंडवागंडवी ऑफलाइन असते,
गंडवागंडवी ऑनलाइन असते !
सावधानतेच्या इशाऱ्याची,
कोपऱ्यात छोटी लाईन असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6762
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
30मार्च2023
 

Wednesday, March 29, 2023

प्राण तळमळला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
प्राण तळमळला...
वीर सावरकरांचा मुद्दा,
नको तेवढा छळू लागला
महाविकास आघाडीचा,
प्राणही तळमळू लागला.
गौरवाकडून कौरवाकडे
यात्रेकरूही वळतो आहे.
बघा कुणाचा कुणासाठी
प्राण कसा तळमळतो आहे?
राजकीय विरोधकांचाचा,
रोज नवा नवा धक्का आहे!
तरीही हारो मत;डरो मत,
इरादा एकदम पक्का आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8214
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29मार्च2023

 

माफीनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

माफीनामा

जसे माफी मागितली म्हणून,
कुणी काही कधी छोटा होत नाही.
तसे न केलेल्या चुकीसाठी,
माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.

तरीही जाणीवपूर्वक चुका करणे,
हे तर अजिबातसुद्धा खरे नाही.
माफीनाम्याचे आग्या मोहोळ,
अंगावरती घेणेसुद्धा बरे नाही.

तरीही मिंध्यांना आणि नकट्यांना
माफीनाम्याचे काहीच वाटत नाही!
जाहीर लोटांगण घातल्याशिवाय,
त्यांना खरे समाधान भेटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6760
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
29मार्च2023
 

Tuesday, March 28, 2023

ज्याचे त्याचे शब्दार्थ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ज्याचे त्याचे शब्दार्थ

आजकाल माफीवीर या शब्दाचा,
प्रचार आणि अपप्रचार जोरात आहे.
तरीही वेगवेगळा अर्थ,
आज ज्याच्या त्याच्या सुरात आहे.

ऐतिहासिक आणि वर्तमान संबंध,
माफीवीर या शब्दाला लावू लागले!
वळचणीचे पाणी अखेर,
पुन्हा वळचणीलाच जाऊ लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8213
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28मार्च2023
 

राजकीय सभांचे टिझर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------

राजकीय सभांचे टिझर

चित्रपटांच्या टिझरसारखे,
राजकीय सभांचे टिझर वाजू लागले.
विरोधकांबरोबर सामान्य जनतेसाठी,
राजकीय सभांचे बझर वाजू लागले.

आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी,
सभांचे ते चित्तवेधक टिझर करतात!
ते विचारांची डिलिव्हरी करताना,
आपल्या विरोधकांचे सिझर करतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6759
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28मार्च2023 

Monday, March 27, 2023

कॉमेडी शो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कॉमेडी शो

कॉमेडी आणि मिमिक्रीवाले,
सगळेच याच्यात आले आहेत.
आजकालच्या जाहीर सभांचे,
चक्क कॉमेडी शो झाले आहेत.

इथे आरोपांचा फुल्ल भडका आहे,
इथे कॉमेडीचा फुल्ल तडका आहे.
फुल्ल मनोरंजनाची गॅरंटी,
वर श्रोत्यांना पैसा अडका आहे.

भाडोत्री गर्दी असली तरी,
हश्या टाळ्यांचा पाऊस पडतो आहे!
राजकीय सभांच्या कॉमेडी शोमुळेच,
न्यूज चॅनलचा टीआरपी वाढतो आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8212
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27मार्च2023
 

कायदेशीर टिप्स....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कायदेशीर टिप्स

जे लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले,
त्यांना सहज माघारी बोलवू शकता.
कुणाचीही आमदारकी खासदारकी,
आता तुम्ही सहज घालवू शकता.

कटकारस्थाने करा, षडयंत्र रचा,
तुम्ही खोट्या केसेसही करू शकता.
न्यायालय बाजूने असले की,
कुणाचाही कर्दनकाळ ठरू शकता.

शब्दाचे अपशब्द करा,
तुम्ही अर्थाचेही अनर्थ करू शकता !
एकदा कुणी जाळ्यात अडकला की,
त्याला अलगद बाजूला सारू शकता!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6758
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
27मार्च2023
 

Sunday, March 26, 2023

मामला फिक्स हैं...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मामला फिक्स हैं

खोट्याची आणि खऱ्याची,
बेमालूम मिक्सिंग असते.
कुठल्याही राजकारणात,
बेमालूम फिक्सिंग असते.

फिक्सिंगवरच पिकतो हश्या,
फिक्सिंगवरच टाळ्या पडतात,
एकदा डाव साधला की,
त्यांच्याच गाली खळ्या पडतात.

खेळा आणि खेळवीत रहा,
हेच फिक्सिंगचे सूत्र असते !
सांगा फिक्सिंग कुठे नाही?
ती अत्र तत्र सर्वत्र असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8210
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26मार्च2023
 

लोकशाही वाचवा !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लोकशाही वाचवा !

जे दाबतात लोकशाहीचा गळा,
त्यांचाच आता आरडा ओरडा आहे.
लोकशाही जिवंत राहिली पाहिजे,
आता त्यांचा उमाळाच कोरडा आहे.

ज्यांना रात्रंदिवस वाटतअसते,
लोकशाही तालावर नाचली पाहिजे.
तेच काढतात रात्रंदिवस गळे,
आपली लोकशाही वाचली पाहिजे.

त्या प्रत्येकालाच वाटू लागले,
तेच खरे लोकशाहीचे वाली आहेत !
चोरांच्या उलट्या बोंबा ऐकून,
छद्मी भाव लोकशाहीच्या गाली आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6758
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
26मार्च2023
 

Saturday, March 25, 2023

भ्रष्ट योगायोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भ्रष्ट योगायोग

कुणाला वाटले खूप कडक आहेत,
कुणाला वाटले खूप शिष्ट आहेत.
जी इतरांची आर्थिक तपासणी करते,
त्या ईडीतसुद्धा काही भ्रष्ट आहेत.

या बातमीने तर धक्काच बसला,
प्रत्यक्ष ईडीतसुद्धा खाबूशाही आहे !
ईडी स्वायत्त संस्था असली तरी,
तिच्यातसुद्धा बाबूशाही आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8209
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
25मार्च2023
 

रूप - कुरूप...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

रूप - कुरूप

जे जे बेकायदेशीर आहे,
त्याला कायदेशीर रूप दिले जाते.
हुकूमशाहीचे रूपांतरसुद्धा,
थेट लोकशाहीमध्ये केले जाते.

कुणी हुकूमशाही म्हटले तरी,
तिथे लोकशाहीचा अनादर होतो.
बेकायदेशीर कार्यक्रम,
कायदेशीरपणाने सादर होतो.

न्यायालयाचा हवाला देऊन,
अन्याय सुद्धा लादला जातो !
राजकारणात सारे काही क्षम्य,
मग पाहिजे तो डाव साधला जातो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6756
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
25मार्च2023
 

Friday, March 24, 2023

सभांचा पाठलाग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सभांचा पाठलाग

कोण कुठे सभा घेतोय?
याचाच मागावर माग आहे.
परस्परांच्या सभांचा,
दणक्यात पाठलाग आहे.

कुणी करतोय लावणी,
कुणाची तर छक्कड आहे.
सभेमागच्या सभेची,
आयडियासुद्धा फक्कड आहे.

एकाच्या पूर्वसभेला जणू,
दुसऱ्याकडून उत्तर आहे !
ज्यांचे घर काचेचे,
त्यांच्याही हाती पत्थर आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8208
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24मार्च2023
 

टार्गेट ईव्हीएम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

टार्गेट ईव्हीएम

कुणाकडून ईव्हीएमचा डंका आहे,
कुणाला ईव्हीएमवरच शंका आहे.
ईव्हीएम मशीन फोडल्याच पाहिजेत,
कुणाचा बॉम्बस्फोटक दणका आहे.

आले गेले ईव्हीएमच्या भदाडीवर,
ईव्हीएम मशीनची अवस्था आहे.
फक्त विरोधकांना हरवण्याचीच,
म्हणे ईव्हीएममध्ये व्यवस्था आहे.

आक्षेप जरूर घ्या;शंकासुद्धा काढा,
पण सत्यापुढे मानसुद्धा झुकवा रे !
मतदारांना मतदान कसे करायचे?
एकदा तरी सगळे मिळून शिकवा रे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6755
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
24मार्च2023
 

Thursday, March 23, 2023

व्यथा आणि कथा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

व्यथा आणि कथा

सगळ्या राजकीय पक्षांच्या,
अगदी सारख्याच व्यथा आहेत.
कमी अधिक प्रमाणामध्ये,
फाटा-फुटीच्याच कथा आहेत.

कोणताही पक्ष फुटला नाही,
ही तर राजकीय थाप आहे !!
फाटा- फुटींच्या कथांचा,
जणू पक्षा पक्षाला शाप आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8208
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23मार्च2023
 

पक्षीय बडवा-बडवी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पक्षीय बडवा-बडवी

तोच तोच मुद्दा पुन्हा पुन्हा,
पक्ष पक्षात फिरला जातो.
भोवतालाच्या बडव्यांसाठी,
विठ्ठल वेठीस धरला जातो.

बडव्यांच्या नावाने मग,
पुन्हा ढोल बडवले जातात.
बडव्यांना वेठीस धरून,
खरे मुद्दे दडवले जातात.

बडव्यांच्या बडवा बडवीत,
बरीच काही दडवा दडवी असते!
मूळ प्रश्नांना हात घातला की,
उत्तरांची उडवा उडवी असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6755
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
23मार्च2023
 

Wednesday, March 22, 2023

धरण,डोळा आणि बुक्की...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

धरण,डोळा आणि बुक्की

एकाला मारला होता डोळा,
आता दुसऱ्याला बुक्की आहे.
कॅमेरा सब कुछ देखता है...
एवढे मात्र अगदी नक्की आहे.

धरण आणि डोळ्यानंतर
बुक्कीने तर हॅटट्रिक मारते आहे!
अचानक येणारी हुक्की,
आत्मक्लेशाला बाधक ठरतेआहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8206
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22मार्च2023
 

भ्रष्टाचाराचा 'हप्ता' बंद !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भ्रष्टाचाराचा 'हप्ता' बंद !

नियमानुसार जरी तो नोबॉल होता,
तरी तो बरोबर स्टंपावर गेला होता.
केवळ सरकारी कर्मचारीच नाही तर,
इथला भ्रष्टाचारही संपावर गेला होता.

कुणाकुणाला वाटू शकते,
आमचे हे जरा अजबच लॉजिक आहे.
भ्रष्टाचाऱ्यांबरोबर भ्रष्टाचार जातो,
हेच तर खरे भ्रष्टाचाराचे लॉजिक आहे.

भ्रष्टाचारमुक्तीसाठी संपावरच जा,
अशी काही आमची सक्ती नाही !
भ्रष्टाचार ही तर प्रवृत्ती आहे,
भ्रष्टाचार म्हणजे काही व्यक्ती नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6753
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
22मार्च2023
 

Tuesday, March 21, 2023

आभारी आहोत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

आभारी आहोत

जरी कर्मचाऱ्यांच्या संपाची लांबी,
लॉंग मार्चपेक्षा थोडी लांबली होती.
तमाम महाराष्ट्रातील लाचखोरी,
तेवढ्यापुरती का होईना थांबली होती.

जणू जसे कर्मचारी संपावर गेले होते,
तशी लाचखोरीही संपावर गेली होती!
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची हौस,
किमान संपकाळात पुरी झाली होती!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8205
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21मार्च2023
 

गद्दारी आणि खुद्दारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गद्दारी आणि खुद्दारी

हे म्हणतात, तेच गद्दार आहेत,
ते म्हणतात, हेच गद्दार आहेत.
गद्दारी आणि खुद्दारीच्या खेळाला,
खरे साक्षीदार तर मतदार आहेत.

गद्दारीची आणि खुद्दारीची,
दरवेळी नवी नवी व्याख्या असते.
परस्परांची टिंगल टवाळी करीत,
वर पुन्हा त्यांचेच ख्या ख्या असते.

वरवर हसवणूक असली तरी,
आत स्वतःचीच फसवणूक असते!
फोटो जुनाच असला तरी,
नव्या फ्रेम मध्ये बसवणूक असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6752
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21मार्च2023
 

Monday, March 20, 2023

वॉशिंग पावडर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

वॉशिंग पावडर

वॉशिंग पावडर निरमाचे गाणे
सगळे कोरसमध्ये गाऊ लागले,
आपल्या वॉशिंग पावडरची कबूल
भाजपावाले बिनधास्त देऊ लागले.

भाजपाच्या वॉशिंग पावडरची,
म्हणे गुजरातमध्ये फॅक्टरी आहे!
ज्याला निर्मळ झाल्यासारखे वाटते,
त्याची तर शुद्ध ॲक्टरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8204
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20मार्च2023
 

मैदानी गोळीबार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मैदानी गोळीबार

मेट्रो-शहरांपासून,खेड्या-पाड्यापर्यंत,
कदमा - कदमावर शब्दांचे वार आहेत.
फक्त घोडा आणि मैदान बदलले जाते,
शाब्दिक गोळीबारावर गोळीबार आहेत.

त्याच त्याच मुलूखमैदानी तोफांचा,
पुन्हा पुन्हा तोच तोच दारूगोळा आहे.
सगळ्यांचा पक्का गैरसमज झालाय,
इथला सामान्य मतदारच भोळा आहे.

सत्ताकारण आणि राजकारणाचे मुद्दे,
सदैव ज्यांच्या त्यांच्या डोक्यात आहेत!
सामान्य सामान्य माणसांचे खरे मुद्दे,
सगळेच्या सगळेच खोक्यात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6751
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
20मार्च2023
 

Sunday, March 19, 2023

मोबाईल महात्म्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मोबाईल महात्म्य

अगदी थोडक्यात सांगतो,
मोबाईलची गोष्ट कशी झाली?
मोबाईलच झाला प्रियकर,
मोबाईलच आता प्रेयसी झाली.

रिकामपणाचे उद्योग म्हणजे,
फक्त मोबाईल चाळणे झाले!
मोबाईलवेड्यांना खेळविणारे,
मोबाईल एक खेळणे झाले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8204
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19मार्च2023
 

धोक्याची घंटा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

धोक्याची घंटा

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची,
आर्थिक अवस्था म्हणे बिकट आहे.
दुसरीकडे लाल परीचा प्रवास तर,
गरज नसलेल्यांनाही फुकट आहे.

कुणाकुणाला तिकीट माफ आहे,
कुणा कुणाला तिकीट हाफ आहे.
राजकारणाला वरदान असले तरी,
कुठलेही फुकटछाप धोरण शाप आहे.

फुकट्यांमुळे तिकिटधारकांचीच
एस.टी.मध्ये पंचायत होऊ शकते !
फक्त घंट्यचा हलवीत बसायची वेळ,
बिचाऱ्या कंडक्टरवरती येऊ शकते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6750
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19मार्च2023
 

Saturday, March 18, 2023

पॉलिटिकल गेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पॉलिटिकल गेम

आजकाल कळेनासे झालेय,
कुणाच्या करियर कोण टपले आहे?
हेरगिरी आणि गुन्हेकथा यांनी तर,
राजकारण पुरते व्यापले. आहे

बदनामीच्या सुपार्‍या बिपाऱ्या,
जाहीर दिल्या घेतल्या जात आहेत.
खंडणीबहाद्दर आणि सुपारीवाले,
त्यांच्या जीवावर मातल्या जात आहेत.

पेरले तसे उगवले जात आहे,
कुठे कुठे तर कुंपणच शेत खात आहे!
वर जाहीर करून मोकळे होतात,
यात आपल्या विरोधकांचाच हात आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8203
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18मार्च2023
 

Friday, March 17, 2023

अवकाळी संकट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
------------------------

अवकाळी संकट

जसे अस्मानी संकट अवकाळी असते,
तसे सुलतानी संकटहीअवकाळी असते
पावसाबरोबर सरकारही अवकाळी,
बघण्याची आपल्यावरती पाळी असते.

पाऊस असो वा सरकार असो,
अवकाळी कोसळले की वाट लागते!
नुकसानीची भरपाई न होताच,
सगळ्यांचीच जमिनीला पाठ लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6749
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17मार्च2023
-----------------


उठा- ठेव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

उठा- ठेव

तुम्ही मला सी.एम.बनवले,
मी तुम्हाला पी.एम. बनवतो आहे.
उपकाराची फेड उपकाराने,
हाच अर्थ याच्यात जाणवतो आहे.

कुणाला हे साटेलोटे वाटते.
कुणाला ही राजकीय देवघेव वाटते.
जे याकडे बारकाईने बघतात,
त्यांना तर ही नसती उठठेव वाटते.

राजकारणात कधी काय होईल?
याचे अंदाज कुणाच्या गावी आहेत?
नसती उठाठेव खरी असली तरी,
ते तर आधीपासूनच भावी आहेत!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8202
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17मार्च2023
 

Thursday, March 16, 2023

संपाची तिसरी बाजू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपाची तिसरी बाजू

दोघांच्या भांडणात,
तिसऱ्याचा तोटा असतो.
कोणत्याही संपाचा
हाच मोठा घाटा असतो.

दोन्हीकडूनही ताणले जाते,
तिसऱ्या वरती आणले जाते!
ज्याचे जळते त्यालाच कळते,
वर असेच मानले जाते.

हाती सत्ता असली की,
तिला संपाचा शाप आहे !
सत्ताधाऱ्यांनी सिद्ध करावे,
सरकार हे मायबाप आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8201
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16मार्च2023
 

संपु दे...संप सारे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपु दे...संप सारे..

आमदार खासदारांची पेन्शन,
सामान्य जनतेला सलते आहे.
सामान्य जनतेचे टेन्शन,
मोठ्या रागा रागाने बोलते आहे.

कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनची,
प्रत्येक सरकारला चिंता आहे.
जुन्या पेन्शनच्या वादावादीत,
भरडलेली सामान्य जनता आहे.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे,
समजू नये फक्त बडगा आहे !!
दोन पावले पुढे,दोन पावले मागे,
हाच खरा संपावरचा तोडगा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6749
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16मार्च2023
 

Wednesday, March 15, 2023

संपाचा पंचनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपाचा पंचनामा

संप कुणाचाही असला तरी,
त्याच्यामध्ये आक्रमक चतुरी असते.
जशी वाटाघाटी, दबाव तंत्र असते,
तशी संपात हमखास फितुरी असते.

जसे काही संप नियोजित असतात,
तसे काही संप आयोजित असतात.
शंका आणि कुशंकांना वाव देणारे,
काही काही संप प्रायोजित असतात.

संपात राजकारण शिरले की,
फंद फितुरीही मुत्सद्दीपणा ठरतो!
बेरजेच्या राजकारणात मग,
खरा प्रश्नच गौण आणि उणा ठरतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6747
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15मार्च2023
 

सत्तेचे शहाणपण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्तेचे शहाणपण

जशी सत्ता असून अडचण,
तशी सत्ता नसून खोळंबा होते.
नेमकी पातळी दाखवणारी,
सत्ता म्हणाजे ओळंबा होते.

जसा ओळंबा कधीच कुणाला,
थोडीही लेवल सोडून देत नाही !
तसा सत्तेशिवाय शहाणपणा,
कधी कुणाला समजून येत नाही.

त्यामुळेच सत्ता जशी माजवते,
तशीच सत्ता लाजवत असते !
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनाही,
सत्ताच नेहमी गाजवत असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8200
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15मार्च2023
 

Tuesday, March 14, 2023

इज्जत का सवाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

इज्जत का सवाल

कालपर्यंत सरळ चालणारे,
आज चक्क स्पायरल होत आहेत.
त्यामुळेच एकमेकांच्या इज्जती,
मीडियावरती व्हायरल होत आहेत.

नको त्यांची, नको नको तिथे,
नको तशी तशी सर्फिंग आहे.
आपले आंबट शौक पुरविताना,
हवी तशी व्हिडिओ मॉर्फिंग आहे.

आता परस्परांच्या हातामध्येच,
परस्परांची सगळी इज्जत आहे!
कॉपी फॉरवर्ड करणाऱ्यांना तर,
बोटे घालण्यातच लज्जत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6747
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14मार्च2023
 

नाटू...नाटू....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
नाटू...नाटू....
जगात जिकडे बघावे तिकडे,
सध्या फक्त नाटू नाटू लागले आहे.
बॉलीवूडसह टॉलीवूडचेही कौतुक,
आता ऑस्करला वाटू लागले आहे.
व्हिस्परत व्हीस्परत का होईना,
आपला हत्ती तर पुढे गेला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे शेपूट
आता मागे राहणार नाही,
हा नवा आत्मविश्वास आला आहे.
कुणाला आहे ऑस्करचा दुस्वास,
कुणी ऑस्कर बाहुलीसाठी हट्टी आहे!
सध्यातरी चित्रपटांच्या विश्व विजयाची,
ऑस्करच युनिव्हर्सल मोजपट्टी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8199
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14मार्च2023
----------------------------------
मराठी वात्रटिका

Monday, March 13, 2023

प्रॅक्टिकलची थिअरी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

प्रॅक्टिकलची थिअरी

सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे,
आपल्या लोकशाहीला बट्टा आहे.
मंत्रीपदासाठीच्या तडजोडी म्हणजे,
कुणा कुणासाठी मात्र सट्टा आहे.

सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे,
सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही.
एकदा आकड्यांचा संगम झाला की,
मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही.

त्यांनीच केलेल्या प्रॅक्टिकलला,
त्यांनीच मांडलेली ही थेअरी आहे!
राजकीय आकडेशास्त्र ऐकून,
कल्याण आणि मुंबईला घेरी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6746
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
13मार्च2023
 

Sunday, March 12, 2023

लाचारोत्सव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लाचारोत्सव

लाचारांकडून लाचार उत्सव,
आजकाल दणक्यात साजरे आहेत.
जे लाचार उत्सवात सहभागी,
ते सगळे हुजरे आणि मुजरे आहेत.

जेवढे ते हुजरे आणि मुजरे आहेत,
त्याहून जास्तच ते बिनलाजरे आहेत!
ते राखतात लाचारीची बूज,
म्हणूनच ते पट्टीचे बुजरे आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8198
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12मार्च2023
 

जातीय गुणधर्म..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------

जातीय गुणधर्म

कुणाला जात मिरवायला आवडते,
कुणाला जात फिरवायला आवडते.
जात कोणतीही असली तरी,
तिला जातीची जिरवायला आवडते.

कुणी कुणी करतो जातीचा प्रचार,
कुणाला वाटते जात प्रचारू नये.
जसे कुणाला वाटते जात विचारू नये,
तसे कुणाला वाटते जात आचारू नये.

कुणाला जात प्रगतीचा मार्ग वाटतो,
कुणाला मात्र जात हा अडसर वाटतो!
जात जातीने जोपासली जाते तरी,
कुणी जात्यांध आणि वेडसर वाटतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6745
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
12मार्च2023

 

Saturday, March 11, 2023

ईडी ईडीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 आजची वात्रटिका
------------------------

ईडी ईडीचा खेळ

आजकाल लहान लहान पोरांचे,
खेळही आता छळायला लागले.
आजकाल लहान मुले सुद्धा,
चक्क ईडी ईडी खेळायला लागले.

यांची त्यांच्यावर धाड आहे,
त्यांची यांच्यावर धाड आहे.
चौकशीनंतर आम्हांला कळाले,
जो टीममध्ये येतो,त्याचालाड आहे.

पोरांचा चालला पोरखेळ,
त्यांच्या नियमांचाही वीट आहे !
जो आपल्या टीम मध्ये येईल,
तोच नाबाद,वर क्लीन चीट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6744
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
11मार्च2023


लॉजिकल विचार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लॉजिकल विचार

राजकारणात असते जादूची कांडी,
कारण राजकारण हे मॅजिक आहे.
दरवेळी बदलत्या भूमिकांचे,
दर वेळीच नवे नवे लॉजिक आहे.

जसे ते मॅजिकली पटत नाही,
तसेच ते लॉजिकलीही पटत नाही!
रेटणारे पाहिजे ते लॉजिक रेटतात,
तसे रेटणारालाही ते खरे वाटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8197
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11मार्च2023
 

Friday, March 10, 2023

आंधळी कोशिंबीर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

आंधळी कोशिंबीर

तिला दिवसभर पुजून होते,
तिला दिवसभर भजून होते.
तिच्या किर्तनाची कॅसेट,
अगदी दिवसभर वाजून होते.

तीही याला भुलत जाते,
तीही त्यामुळे फुलत जाते.
तुम्ही जसे घुलवाल,
तशी तिही त्याला घुलत जाते.

तिच्याबरोबर सर्वांनाच,
सगळा प्रकार कळला जातो!
दरवर्षीच्या आठ मार्चला,
हाच खेळ पुन्हा खेळला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8196
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10मार्च2023
 

अर्थसंकल्प आणि विरोधक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

अर्थसंकल्प आणि विरोधक

असे मुळीच नाही की,
हे कुणाच्या लक्षात आले नाही.
अर्थसंकल्पाचे स्वागत कधी,
कोणत्याच विरोधकांनी केले नाही.

संकल्पाचा अर्थ कसा लावायचा?
विरोधकांचे आधीच ठरलेले असते!
पूर्वग्रहदूषित प्रतिक्रिया द्यायचे,
एवढेच काय ते हाती उरलेले असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6743
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
10मार्च2023
 

Thursday, March 9, 2023

नॅकांकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नॅकांकन

सांगतो ती खबर ऐकून,
कुणी ख्याक ख्याक करू नका.
गुणवत्तेचा टेंभा मिरवीत,
उगीच कुणी नॅक नॅक करू नका.

नॅकचा बाजारभाव ऐकून
जाग्यावरच पॅक होवू शकता.
मानांकनाच्या सावळ्या गोंधळाने,
जाग्यावरच क्रॅक होऊ शकता.

पोत्यांच्या स्वच्छतागृहापासूनच,
नॅक मानांकन मनात खुपत आहे !
तरीही जो खोटे बोलेल त्याला,
विद्या आणि पिठाची शपथ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6742
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9मार्च2023
----------------------------------
मराठी वात्रटिका
 

Tuesday, March 7, 2023

जागते रहो....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
जागते रहो
सवंग आणि उथळ असत्य,
अगदी वर्षानुवर्षे उफणली जातात.
ऐतिहासिक सत्य मात्र,
काळाच्या आड दफनली जातात.
दफनलेल्या ऐतिहासिक सत्यांना,
कशामध्ये तरी गुंडाळले जाते.
काखेत कळसा ठेवून मग,
त्या सत्याला गावभर धुंडाळले जाते.
प्रस्थापित असत्यच मग,
उजळ माथ्याने फिरवली जातात !
सत्याग्रही आणि सत्यशोधक,
अधर्मी आणि पापी ठरवली जातात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6741
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7मार्च2023
7मार्च2023

 

देशी म्हणाली विदेशीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

देशी म्हणाली विदेशीला

तुझ्यात आणि माझ्यात
सांस्कृतिक ऐक्याचे बंधन आहे.
कधी असते निमित्त गटारीचे,
कधी निमित्ताला धुलीवंदन आहे.

कधी कधी असतो जयघोष,
जियो और जिने दो.
गटारीला आणि धुलीवंदनाला,
पियो और पिने दो.

विदेशी विदेशी म्हणून,
तू उगीच लाजत जावू नकोस !
आत्मनिर्भर भारताचे डोस,
पेताडाना पाजत जावू नकोस !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8195
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7मार्च2023
 

Monday, March 6, 2023

जत्रा ते यात्रा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

जत्रा ते यात्रा

ज्यांना कुणाला वाटते भीती,
ज्यांना कुणाला वाटते खतरा आहे.
त्यांचीच चाललेली पायपीट,
त्यांचीच जत्रा आणि यात्रा आहे.

राजकीय यात्रा आणि जत्रात,
जसे हौशे आणि नवशे आहेत !
जे साधतात नेमक्या संध्या,
असे महाबिलंदर गवशे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8194
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6मार्च2023
 

सत्कारनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्कारनामा

भामट्यांकडून भामट्यांचे,
चालले सत्कार आज इथे.
वाघांच्या डरकाळ्या ठरतात,
घुबडांचे घुत्कार आज इथे.

अस्तनीतल्या नागांचेच,
चालले फुत्कार आज इथे.
नालायकांसाठी लायकांचे,
चालले धुत्कार आज इथे.

जरी दबलेल्या आवाजाचे,
उठती चित्कार आज इथे!
तरी मिंध्यांकडून मिंध्यांचेच
जाहीर सत्कार आज इथे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6740
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6मार्च2023
 

Sunday, March 5, 2023

उलटी रीत,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
उलटी रीत
खोटी आपुलकी,खोटा उमाळा;
यांना तर अगदीच बहर आहे.
त्याला प्रोत्साहन,त्यालाच किंमत,
सगळा खोटेपणाचा कहर आहे.
साटेलोटे हा व्यवहार झाला,
दिखावू व्यवहार विकावू झाले.
जे जे काही टाकावू आहे,
ते तेच तर आज टिकावू झाले.
जे जे काही विकावू आहे,
त्याची तर  सर्वत्र चलती आहे !
दुनियेची ही उलटी रीत,
संवेदशीलतेलाच सलती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8193
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5मार्च2023

 

बुरा न मानो.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बुरा न मानो.....

लोकांना बोंबलायलाच लावायचे,
असेच जणू ठराव होत असतात.
एका दिवसाच्या शिमग्याचे,
जणू वर्षभर सराव होत असतात.

कधी सुलट्या,नेहमीच उलट्या,
बोंबावर बोंबा ठोकल्या जातात.
बोंबा ऐकण्याच्या सरावामुळे,
वाट्टेल त्या गोष्टी धकल्या जातात.

कधी यांच्या तर कधी त्यांच्या,
सत्तेवरती पक्षीय टोळ्या असतात!
बारा महिने तेरा त्रिकाळ,
जनतेच्या अपेक्षांच्या होळ्या असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6739
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5मार्च2023
 

Saturday, March 4, 2023

मोबाईल कॉपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मोबाईल कॉपी

जसे पूर्वीही पेपर फुटायचे,
तसे आताही पेपर फुटू लागले.
मोबाईलचे नवे पंख,
आता पेपरलाही भेटू लगले.

झेरॉक्स सेंटरवरचे कॉपी-पेस्ट,
आता मोबाईलवर होऊ लागले.
त्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त भाव,
आता फुटलेले पेपर खाऊ लागले.

त्यामुळेच तर कॉप्यांचाही,
आता जोरात सुळसुळाट आहे !
परीक्षेपूर्वी फुटलेल्या पेपरला,
गुणवंतांचा तळतळाट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8192
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4मार्च2023
 

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...