Thursday, March 16, 2023

संपु दे...संप सारे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपु दे...संप सारे..

आमदार खासदारांची पेन्शन,
सामान्य जनतेला सलते आहे.
सामान्य जनतेचे टेन्शन,
मोठ्या रागा रागाने बोलते आहे.

कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनची,
प्रत्येक सरकारला चिंता आहे.
जुन्या पेन्शनच्या वादावादीत,
भरडलेली सामान्य जनता आहे.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे,
समजू नये फक्त बडगा आहे !!
दोन पावले पुढे,दोन पावले मागे,
हाच खरा संपावरचा तोडगा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6749
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16मार्च2023
 

No comments:

नवी लोकशाही.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नवी लोकशाही प्रत्येक वेळी बहुमताचा आदर,  ठेवला जातोच असे नाही.  यासारखे दुसरे कोणतेच,  लोकां...