Monday, August 15, 2022

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
---------------------

बिहार पॅटर्न

जसे कर्म तसे फळ,
हे लगेच प्रत्यक्षात आले.
महाराष्ट्रात जे कमावले,
ते बिहारमध्ये गमावले गेले.

करावे तसे भरावे लागते,
याचाच हा गोलक आहे!
उद्याच्या भारताची,
बिहारमध्ये झलक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8011
दैनिक झुंजार नेता
13ऑगस्ट

15 ऑगस्ट 2022... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

15 ऑगस्ट 2022

सुट्ट्यांच्या गराड्यात,
स्वातंत्र्य दिन अडकला आहे.
हर घर तिरंगा,
फड फड फडकला आहे.

मागे सुट्टी,पुढे सुट्टी,
जो तो पुनीत झाला आहे.
स्वातंत्र्य दिनाचा आनंद,
द्विगुणीत झाला आहे.

असा कर्मचारी वर्ग खूप कमी,
जो सुट्टीमुळे खुश झाला नाही!
तरी बरे स्वातंत्र्य दिन,
रविवारी काही आला नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6558
दैनिक पुण्यनगरी
14ऑगस्ट2022

 

झेंडे लावा....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

झेंडे लावा

हर घर तिरंगा म्हणताच,
नवरे झेंडे लावीत सुटले.
नवऱ्यांचे उद्योग बघून,
बायकांचे डोके उठले.

झेंडा लावणे हा वाक्प्रचार,
शब्दशः सिद्ध आहे.
बायका म्हणाल्या नवऱ्यांना,
आता मात्र तुमची हद्द आहे.

झेंडे लावण्याच्या स्वातंत्र्याचा,
नवऱ्यांनी स्वैराचार केला !
कुणाच्या कलपनेचा बघा,
कुणाला कसा कहार झाला !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6557
दैनिक पुण्यनगरी
13ऑगस्ट2022

 

Friday, August 12, 2022

ऑप्शन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

ऑप्शन

मी पुन्हा आलो...
फोटोखाली कॅप्शन आहे.
कोणते खाते पाहिजे?
अशी मंत्र्यांना ऑप्शन आहे.

ऑप्शन विचारल्याने मंत्र्यांचे,
बघण्यासारखे लुक आहेत !
जरी ऑप्शन विचारले तरी,
काही खाती आधीच बुक आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6556
दैनिक पुण्यनगरी
12ऑगस्ट2022

 

Thursday, August 11, 2022

नवा तिढा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नवा तिढा

सत्तेमध्ये सेना आहे,
विरोधातही सेना आहे.
जनतेला वाटू शकते,
आपलाच येडपटपणा आहे.

जनता जेवढी वेड्यात आहे,
तेवढीच ती कोड्यात आहे !
कोड्याची सगळी उकल,
रोजच्या नव्या तिढ्यात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8010
दैनिक झुंजार नेता
11ऑगस्ट2022
----------------------------

उलटी गंगा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

उलटी गंगा

तुमचंही विश्वास बसणार नाही,
आमचासुद्धा विश्वास बसत नाही.
विरोधकांएवढी जनतेची काळजी,
जगात कुणाला सुद्धा असत नाही.

विरोधक सत्ताधारी झाले की,
त्यांना स्वतःचीच काळजी वाटू लागते!
विरोधक असतानाचे जनता प्रेम,
सत्ताधारी होताच आटू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6555
दैनिक पुण्यनगरी
11ऑगस्ट2022

 

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...