Showing posts with label उलटी गंगा... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label उलटी गंगा... मराठी वात्रटिका. Show all posts

Tuesday, December 20, 2022

उलटी गंगा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

उलटी गंगा

मागणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या
मूर्खपणामुळे हे झाले आहे.
साम दाम दंड भेद वापरून,
घेतलेले मतदान,
त्याचे याला,याचे त्याला गेले आहे.

जसे कुणी कुणी चुकून जिंकले आहेत,
तसे कुणी कुणी चुकून हरले आहेत!
निकाल स्पष्टपणे सांगतो आहे,
आपल्यांनीच आपल्याला,
खडे चारले आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8126
दैनिक झुंजार नेता
20डिसेंबर2022
 

Thursday, August 11, 2022

उलटी गंगा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

उलटी गंगा

तुमचंही विश्वास बसणार नाही,
आमचासुद्धा विश्वास बसत नाही.
विरोधकांएवढी जनतेची काळजी,
जगात कुणाला सुद्धा असत नाही.

विरोधक सत्ताधारी झाले की,
त्यांना स्वतःचीच काळजी वाटू लागते!
विरोधक असतानाचे जनता प्रेम,
सत्ताधारी होताच आटू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6555
दैनिक पुण्यनगरी
11ऑगस्ट2022

 

Sunday, June 19, 2022

उलटी गंगा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

उलटी गंगा

आपले म्हणी आणि वाक्प्रचार,
आज-काल खोटे होऊ लागले.
दोघांच्या भांडणांमध्ये,
तिसऱ्यांचेच तोटे होऊ लागेल.

दोघांच्या भांडणांमध्ये,
हल्ली दोघांचाही लाभ आहे.
खऱ्याच्याच पदरी गोटा,
ही खूप चिंताजनक बाब आहे.

कालचे सावही आज चोरटे झाले,
त्यांच्यासुद्धा बोंबा उलट्या आहेत!
जे होते निश्चयाचे महामेरू,
त्यांच्याही आज कलट्या आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7964
दैनिक झुंजार नेता
19जून2022

 

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...