Saturday, September 12, 2026

ट्रेंडचा जमाना...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------

ट्रेंडचा जमाना 

काल एक ट्रेंड होता,
आज एक ट्रेंड आहे. 
ट्रेंडच्या जमान्याला, 
सांगा कुठे  एंड आहे?

कोणत्याही ट्रेंडला, 
मीडियाची चालना आहे.
सगळ्याच ट्रेंडची.
एकमेकांशी तुलना आहे.

ट्रेंड असतो मास हिस्टेरिया,
ट्रेंड म्हणजे आजार असतो !
ट्रेंड  कोणताही असो,
त्याचा नेहमी बाजार असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9396
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
12 सप्टेंबर  2026

No comments:

मध्यम मार्ग ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- मध्यम मार्ग जसे डीजे मुक्तीवाले भक्त आहेत, तसे डीजे सक्तीवाले भक्त आहेत. डीजे वरती मध्यम मार्ग क...