आजची वात्रटिका
----------------------------
सुपर अल निनो
सुपर अल निनोच्या चाहूलीने,
वातावरण तापायला लागले.
भावी संकटांच्या भीतीमुळे,
जग थरथर कापायला लागले.
कुठे दुष्काळाचा तर,
कुठे उष्माघाताचा धोका आहे.
निसर्गाच्या सहनशीलतेचीही,
स्वतःची एक सीमारेखा आहे.
जगा आणि जगू द्या,
निसर्गाची माणसाला ऑफर आहे!
अल निनोच सहन होईना,
त्यात त्याची वाटचाल सुपर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9409
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 सप्टेंबर 2026

No comments:
Post a Comment